5. तोंडी बक्षिस
एकदा एक कवी एका श्रीमंत माणसाकडे गेला. तेथे स्थाने आपल्या कविता गाऊन दाखविल्या, कवीला वाटले आता आपल्याला काहीतरी बक्षिसी मिळेल. पण तो श्रीमंत मनुष्य अतिशय चिक्कु होता. तो म्हणाला, 'कविराज, तुमच्या कविता ऐकून मी तर फारच खूष झालो. उद्या तुम्ही या म्हणजे मीही तुम्हाला खूप करून टाकीन.'
कवीला बाटले आपल्याला उद्या चांगले बक्षीस मिळणार म्हणून मोठ्या आनंदाने तो घरी गेला, दुसऱ्या दिवशी कवी त्या श्रीमंताकडे गेला. तेव्हा तो म्हणाला, 'कविराज, तुम्ही जर्स कविता ऐकवून मला खूष केलंत तसंच तुम्हाला नुसतं 'उद्या या,' असं म्हणून मीही तुम्हाला खूप केलं. प्रत्यक्ष तुम्ही मला काहीच दिलं नाहीत. तसं प्रत्यक्ष मीही तुम्हाला काही देणार नाही आणि हा सरळ व्यवहार आहे.
ते ऐकून कवि निराशा होऊन घरी गेला. ही हकीगत त्या कवीच्या मित्राने बिरबलाच्या कानावर घातली. तेव्हा बिरबल म्हणाला, 'ठीक आहे. त्याला चांगला धडा शिकवू या. तुम्ही असं करा, त्या श्रीमंत मनुष्याची ओळख करून घ्या. नंतर एक दिवस त्याला जेवायला बोलवा. त्या वेळी बच्ा आणि त्या कवीलाही बोलवा. आपण सर्व ठरलेल्या वेळेच्या अगोदरच येऊ आणि जेऊन घेऊ आणि तिथे आरामात गप्पागोष्टी करीत बसू. पुढे मग काय करायचं ते मी बघतो.'
काही दिवसांनी त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम ठरला. श्रीमंत मनुष्पास जेवण्यास बोलविण्याचा दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे तो श्रीमंत कंजुष जेवण्यासाठी आला. तेव्हा तेथे बिरबल, तो कची व इतर काही भां मित्र आरामात गप्पागोष्टी करीत बसले होते.
हळूहळू वेळ जाऊ लागला आणि दुपारचे तीन वाजले तरी आपल्या गप्पा थंडपणे चालल्याच होल्या. अखेर त्या श्रीमंत व्यक्तीस धीर न निघून तो म्हणाला, 'आता जेवायला उठायचं की नाही. दुपारचे तीन वाजले. जेवायची वेळ टळून गेली.'
'मी तरी कुठे म्हणतो योग्य आहे म्हणून ! पण था कविराजांना मात्र तुम्ही' उद्या या ' म्हणून सांगून त्यांची थट्टा केलीत, तुम्हालाही नुसतं खूष करण्याकरताच मी बोललो. आम्हाला वाटलं हीच सम्प लोकांची वागण्याची रीत !' बिरबल हसत हसत म्हणाला.
ते ऐकून तो श्रीमंत मनुष्य शरमून गेला आणि त्याने कवीला मोठे बक्षिस दिले.
----------------------------
स्कॉलरशिप / नवोदय / N.M.M.S / विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी / शालेय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी खालील WHATS APP GROUP व WHATS APP CHANNEL ला FOLLOW करा.WHATS APP GROUP ला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा
---------------------------------------WHATS APP CHANNEL FOLLOW करा👇
--------------------------५ वी स्कॉलरशिप परीक्षा परिपूर्णतयारी