४. बादशहाचे स्वप्न
बादशहाला एकदा स्वप्न पडले. त्यात असे दिसले की, त्याचे सर्व दात पडले नि फक्त एकच शिल्लक राहिलाय.
दुसऱ्या दिवशी बादशहाने राज्यातील सर्व ज्योतिषांना दरबारात बोलाविले. त्यांना आपल्या स्वमाचा अर्थ विचारला.
सर्व ज्योतिषांनी खूप विचार केला. एकमेकांशी चर्चा केली नि शेवटी बादशहाला त्यांनी सांगितले.
'सरकार, आपल्या स्वप्नाचा अर्थ असा आहे, की आपले सर्व नातेवाईक आपल्या अगोदर निधन पावतील !'
त्यांचे म्हणणे ऐकून बादशहाला राग आला. त्याने त्यांना एक पेही न देता दरबारातून घालवून दिले.
तेवढयात बिरबल दरचारात आला. बादशहाने बिरबलला पाहाताच जवळ येण्याची खूण केली.
बिरबलला त्याने आपले स्वप्न सांगितले आणि त्याचा अर्थ विचारला.
बिरचलाने जरा वेळ विचार केला.
तो म्हणाला, 'सरकार, आपल्या स्वप्नावरून असे दिसून येते की, आपल्या सर्व नातेवाईकात आपणच सर्वात दीर्घायुषी ठरणार आहात. सर्वांत जास्त आयुष्य आपण उपभोगणार आहात.'
बिरबलाचे चतुराईचे चोलणे ऐकून बादशहा एकदम खूप झाला. त्याने आपल्या आवडत्या बिरबलला खूप मोठे बक्षीस दिले.
----------------------------
स्कॉलरशिप / नवोदय / N.M.M.S / विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी / शालेय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी खालील WHATS APP GROUP व WHATS APP CHANNEL ला FOLLOW करा.WHATS APP GROUP ला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा
---------------------------------------WHATS APP CHANNEL FOLLOW करा👇--------------------------
५ वी स्कॉलरशिप परीक्षा परिपूर्णतयारी