३. बादशहा आणि चित्रकार
एकदा बादशहाने बिरबलला आपल्या आवडत्या घोड्याचे चित्र काडून द्यायला सांगितले. बिरबलनं एका चांगल्या चित्रकाराला बोलावून बादशहाच्या घोड्याचे चित्र काढून घेतले. मग बिरबल त्या चित्रकारासह ते चित्र घेऊन बादशहाकडे गेला. आपल्या घोड्याचे हुबेहूब चित्र पाहून बादशहाला खूप आनंद झाला. पण त्यानं तो बोलून दाखवला नाही. त्यानं बिरबलला चिडवायचं ठरवलं.
त्यानं त्या चित्राचं कौतुक तर केलं नाहीच पण चित्रातले दोष दाखवायला सुरुवात केली. ते ऐकुन चित्रकाराला राग आला. पण न्याय मागणार कुणाकडे ? तो मुकाट्यानं खाली मान घालून उभा राहिला. कलाकार मग तो छोटा असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत, आपल्या कलेचा अपमान कोणालाच सहन होत नाही. इथेही तसंच झालं. कलाकाराचं एवढंस तोंड पाहून बिरबलला बाईट वाटलं.
तो बादशहाला म्हणाला,
'खाविंद, आपण आपल्या घोड्यालाच या चित्राजवळ उभे करू. मग तुम्हाला काय दोष सांगायचेत ते सांगा.
'ठीक आहे.' बादशहाने अनुमती दिली.
आज्ञेप्रमाणे लगेच घोडा घेऊन शिपाई हजर झाले. तेव्हा एक गंमत झाली. ते चित्र पाहून घोदा खिंकाळ लागला. तेव्हा बादशहानं विचारले,
'घोडा का खिंकाळतोय ?'
तेव्हा बिरबल म्हणाला,
'खाविंद, आपल्या पोव्याला आपल्यापेक्षा कलेचे ज्ञान अधिक आहे. चित्रातील पोचा आपला साथीदार समजून त्याच्याबरोबर पाण्यास आपला घोडा उत्सुक आहे. कलाकाराच्या कलेच्या जिवंत पणाचा आणखी चांगला पुरावा कोणता असेल ?'
बादशहाला बिरबलच्या हुषारीचं कौतुक वाटतं. त्यानं पोळ्याचं चित्र अगदी हुबेहूच काढल्याचं मान्य केलं नि चित्रकाराला मोठं बक्षिस दिलं.
----------------------------
स्कॉलरशिप / नवोदय / N.M.M.S / विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी / शालेय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी खालील WHATS APP GROUP व WHATS APP CHANNEL ला FOLLOW करा.WHATS APP GROUP ला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा
---------------------------------------WHATS APP CHANNEL FOLLOW करा👇--------------------------
५ वी स्कॉलरशिप परीक्षा परिपूर्णतयारी