अतिशहाणपण भोवले
बादशहा अकबर जरा लहरीच होता. तो कधी कोणाला कोणतं काम सगिल. त्याचा नेम नव्हता. एखादी कल्पना सुचली की ती तो प्रत्यक्षात आणणारच. त्यामुळे दरबारातले सरदार नेहमी धास्तावलेले असत,
एकदा दोन सरदारांनी बादशहाला खूप करण्यासाठी म्हटलं,
'हुजूर तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा. तुमच्यापुढे हजर करू.'
बादशहानं ओळखलं की आपल्याला खूष करण्यासाठी याचं पुढे पुढे करणं आहे हे! त्यानं हसून म्हटलं,
'ठीक बाहे तुम्ही एवढा आग्रह करत आहात तर तुमच्यापैकी एकानं कागदात हवा बांधून आणा नि दुसऱ्यानं कागदात गुंडाळून अग्नी आणा.
ते दोघे सरदार एकदम गप्पच झाले. त्यांच्या मनात आले. कुठून बादशहांना विचारायला गेलो नि नसतं झेंगट मार्ग लावून घेतलं. पण आता काहीतरी केल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्यांनी बादशहाकडून मुदत मागून घेतली. बादशहानंही त्यांना पाहिजे तेवढी मुदत दिली. विचार करून त्याचं डोकं फुटायची वेळ आली. पण उपाय काही सापडला नाही. शेवटी त्यांना बिरबलची आठवण झाली. तोच या संकटातून आपल्याला वाचवील, नाहीतर त्यांना आपल्या हातानं आपलं मरण ओढवून घेण्याचं लक्षण दिसत होतं.
शेवटी दोघे बिरबलकडे गेले. त्याचे पाय घरून म्हणाले,
'बिरबल आम्हाला या संकटातून वाचविणं केवळ तुझ्याच हातात आहे. तू काहीतरी उपाय सुचव.' असं म्हणून त्यांनी सगळी हकीगत बिरवलला सांगितली.
बिरबलनं जरा वेळ विचार केला. मग त्यांना म्हणाला,
'तुम्ही एकजण कागदाचा कंदील नि एकजण कागदाचा पंखा करून तो घेऊन बादशहाकडे जा.' बिरबलची युक्ति ऐकून दोघा सरदारांना आनंद झाला. त्यांनाही बिरबलचं मोठेपण मान्य करावं लागलं. ते बिरबलचे आभार मानून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी एकानं हातात कागदाचा कंदील नि दुसऱ्यानं कागदाचा पंखा घेतला व ते बादशहाकडे गेले. बादशहाला आश्चर्य वाटलं. बिरबल हळूच गालातल्या गालात हसत होता. नेमकं त्याच वेळी बादशहाचं लक्ष बिरबलकडे गेलं. बादशहा समजला. त्यानं सरदारांना विचारले
' हे डोकं कुणाचं ?' ते ऐकून सरदार घाबरले. त्यांनी बिरबलचे नाव सांगून टाकले.
तेव्हा बादशहा त्यांना म्हणाला,
पुन्हा असा बडेपणा करू नका. तुमच्या अंगच्या गुणांची कदर दरबारात जरूर केली जाईल, अतिशहाणपणा करणं चांगलं लक्षणं नाही.'
---------------
स्कॉलरशिप / नवोदय / N.M.M.S / विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी / शालेय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी खालील WHATS APP GROUP व WHATS APP CHANNEL ला FOLLOW करा.WHATS APP GROUP ला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा
---------------------------------------WHATS APP CHANNEL FOLLOW करा👇--------------------------
५ वी स्कॉलरशिप परीक्षा परिपूर्णतयारी
५ वी नवोदय परीक्षा १८ जानेवारी २०२५ संभाव्य उत्तरसूची CLICK HERE
गणित स्वयंअध्ययन कार्ड्स maths self study cards CLICK HERE
संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका PDF 'काजवा' CLICK HERE
मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स walimbe vyakaran pustika notes pdf CLICK HERE
१२ वी नंतर काय ? CLICK HERE
500 अतिमहत्त्वाचे इंग्रजी शब्द CLICK HERE
भागाकार तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे १०० उदाहरणे CLICK HERE
मुख्याध्यापक मार्गदर्शिका CLIK HERE
====================