बादशहा आणि ज्योतिषी
अकबराच्या दरबारात बरेच कलावंत होते. तसेच अनेक शास्त्रांत पारंगत असे विद्वानही होते. तरीही इतर ठिकाणांहून राज्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कलावंत व विद्वान लोकांचा राजा योग्य मानसन्मान करीत असे.
एके दिवशी राजा दरबारात आला. तेव्हा बिरबलने त्याला शहरात एक प्रख्यात ज्योतिषी आल्याची बातमी सांगितली. राजाने विचार केला, चला या ज्योतिषाची थोडी परीक्षा बघू. राजाचा भविष्यावर फार विश्वास होता.
राजाने ज्योतिषास दरबारात येण्याचे निमंत्रण दिले. निरोप मिळताच ज्योतिषी दरबारात हजर झाला. राजाला नमस्कार करून तो म्हणाला, 'महाराज, मी फार लांबलांचचा प्रवास करून आलो आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांचे मी भविष्य वर्तविले व ते खरेही ठरले आहे. आपण मला एखादा प्रश्न विचारून पहा. मी केलेले भाकित जर खोटे ठरले तर मी भविष्य वर्तवणे सोडून देईन !'
एवढे ऐकून बादशहा त्याला म्हणाला, 'राज्याच्या दृष्टीने चालू वर्ष कसे जाईल ? भरभराट होईल किंवा कसं ते सांगा. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूवर स्वारी करून त्यांचा बंदोवस्त करण्याच्या विचारात आम्ही आहोत त्यांत यश येईल का ?'
त्यावर ज्योतिषाने कुंडली मांडून सांगितले, 'महाराज, क्षमा करा, पण या वर्षी आपली ग्रहदशा चांगली नाही. कुठल्याही मोहीमेवर आपण जाऊ नका. उलट शत्रूकडूनच स्वारी होऊन आपलं नुकसान होणार आहे !'
ते ऐकून बादशहा चिंताक्रांत झाला. त्याने ज्योतिषाला योग्य मोबदला देऊन त्याची बोळवण केली. त्यानंतर बादशहाने मोहीमेवर जाण्याचा बेत रद्द केला.
एक वर्ष उलटून गेलं पण त्या काळात विशेष असं काहीही घडलं नाही. कोणा शत्रूकडून कसलाही बास वगैरे झाला नाही.
एक दिवस बिरबलने बादशहाला भविष्याची आठवण करून दिली व म्हणाला, 'महाराज आपण ज्योतिषावर एवढा अंधावश्वास ठेवू नका. गेल्या संपूर्ण वर्षात आपल्यावर कोणी स्वारी केली नाही की आपलं कसलंही नुकसान झालेलं नाही. उलट आपण स्वस्थ बसल्यामुळे आपले शत्र शेफारलेत. त्या ज्योतिषाचं न ऐकता आपण जर शत्रूवर चढाई केली असती तर त्यांना नकी वठणीवर आणता आलं असतं. '
ते ऐकून बादशहा क्षणभर काही बोलला नाही. मग तो म्हणाला, 'बिरबल तुझं म्हणणं मला पटतंय्. पण ज्योतिषशास्त्र खोटं आहे असं तुला म्हणायचं आहे का ?'
'छे, छे!' बिरबल उत्तरला, 'असं मला मुळीच म्हणायचं नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, तो ज्योतिषी काही आपल्या माहितीतला नव्हता. तेव्हा केवळ त्याच्या भाकितावर विश्वासून न बसता आणखी आपल्या माहितीच्या चार नामांकित ज्योतिषांचा सल्ला आपण घेतला असतात तर आपल्याला खरोखर योग्य निर्णय घेता आला असता. अन् तेच आपल्या फायद्याचं ठरलं असतं.' त्यावर बादशहाने नुसतीच मान हलविली.
------------------
स्कॉलरशिप / नवोदय / N.M.M.S / विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी / शालेय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी खालील WHATS APP GROUP व WHATS APP CHANNEL ला FOLLOW करा.WHATS APP GROUP ला ADD होण्यासाठी खालील WHATS APP च्या लोगोवर क्लिक करा
---------------------------------------WHATS APP CHANNEL FOLLOW करा👇--------------------------
५ वी स्कॉलरशिप परीक्षा परिपूर्णतयारी