rimc exam Rashtriy Indian Military College Dehradun Admission 2024 राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश


राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, देहराडून प्रवेश प्रक्रिया (8 वी) प्रसिद्धीपत्रक (Rashtriy Indian Military College Dehradun Admission)

जा.क्र.मरापप/RIMC/डिसेंबर/२०२४/3052 दि. २.३/०७/२०२४


प्रसिध्दीपत्रक परीक्षा प्राधान्य


प्रति,

मा. महासंचालक,

माहिती जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, तळमजला,

मुंबई - ४०० ०३२.


विषयः- राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) डिसेंबर, २०२४ विनामूल्य प्रसिध्दी देणेबाबत.


संदर्भ: मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, यांचे क्र. EE/Dec २४/NT दि. १२ जुलै, २०२४ रोजीचे पत्र.


महोदय,

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) ०१ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील (इंग्रजी व मराठी) विनामूल्य प्रसिध्दीस द्यावयाच्या निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे. कृपया सोबतचे प्रसिध्दीपत्रकास राज्यातील सर्व वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.


आपली विश्वासू,

(अनुराधा ओक)

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -४

================


प्रसिध्दीपत्रक राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२४


महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी "राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता ८ वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात.


१) शैक्षणिक पात्रता: 

विद्यार्थी विद्यार्थीनी (उमेदवार) दि. ०१ जुलै, २०२५ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण झालेला असावा.


२) वय :

 या परीक्षेसाठी विद्यार्थी / विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक ०१ जुलै, २०२५ रोजी ११% (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजेच विद्यार्थी विद्यार्थीनीचा जन्म दिनांक ०२. जुलै २०१२ च्या आधीचा व दिनांक ०१ जानेवारी २०१४ च्या नंतरचा नसावा.


३) परीक्षा शुल्क : 

आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकताः-


४) आवेदनपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया परीक्षेचे माहितीपत्रक, आवेदनपत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून उत्तराखंड पिन कोड- २४८००५ यांचेमार्फत खालील पद्धतीने मागविता येईल.


अ) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सर्वसाधारण व इतर संवर्गाकरिता रु. ६००/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्मची) मागणी आपणास करता येईल.


ब) डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. ६००/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- चा डी.डी THE COMMANDANT RIMC FUND, DRAWEE BRANCH, HDFC BANK, BALLUPUR CHOWK, DEHRADUN, (BANK CODE 1399), UTTARAKHAND यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. THE COMMANDANT "RASHTRIYA INDIAN MILITARY COLLEGE, DEHRADUN, UTTARAKHAND, २४८ ००३ या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. तसेच इंग्रजी कॅपिटल अक्षरातच लिहिलेला अथवा टाईप केलेला असावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.


टीप:- > परीक्षेसाठी मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेमार्फत पुरवलेलेच आवेदनपत्र वैद्य/ग्राह्य धरले जाईल.


> परीक्षेसाठी मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचे आहे. 

स्थानिकरित्या छपाई केलेले छायांकित प्रतीतले व RIMCचा होलोग्राम नसलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाहीत.


> आवेदनपत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.


५) कागदपत्रेः- 

आवेदनपत्र (फॉर्म) २ (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे..

अ) जन्म दाखल्याची छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)

ब) उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी)

क) अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).

ड) विद्यार्थ्यांचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.

इ) आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे. बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे/विद्यार्थीनीचे (उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.

ई) विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो (मागील बाजूस विद्यार्थ्याच्या सहीसह)

उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.

परीक्षेचे वेळापत्रक




सूचना : आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्यमंडळ) भांबुर्डा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर पुणे ४११००४. या पत्त्यावर दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत. कुठल्याही परिस्थितीत आवेदनपत्र RIMC, कडे जमा करु नयेत.

====================

PRESS NOTE 

Rashtriya Indian Military College (R.I.M.C.) DEHRADUN ENTRANCE EXAMINATION 

December 2024


The RIMC Entrance Examination for admission of Boys and Girls to Class VIII for the January 2025 term will be held on 1 December, 2024 (Sunday) at Pune.


Eligibility Criterion


1. Educational Qualification:

The candidate should either be studying in Class VII or passed Class VII from any recognized school at the time of admission to the RIMC, i.e.on 01 July, 2025.


2. Age: 

Boys and Girls both are eligible to apply for admission to the RIMC, Dehradun. The candidate should be in the age bracket of 11½ to 13 years as on 01 July, 2025, i.e. they should not be born earlier than 02 July 2012 and not later than 01 January 2014. The applicants should be informed that no application for change in the date of birth, that originally given by them would be entertained later by the college authorities.


3. Procedure to Obtain Application Forms


The prospectus cum Application Form and Booklet of Old Question Papers can be obtained from The Rashtriya Indian Military College, Garhi Cantt, Dehradun, Uttarakhand, pin -248003 by following methods.


(a) Online Payment: 

The Prospectus cum Application Form and Booklet of Old Question Papers can be obtained by making online payment of Rs-600/- for General Candidates & Rs- 555/- for SC/ST candidates on RIMC website www.rime.gov.in (on receipt of the payment, the Prospectus cum Application Form and Booklet of Old Question Papers will be dispatched by Speed Post only.)


(b) By Sending Demand Draft: 

The Prospectus cum Application Form and Booklet of Old Question Papers can be obtained by sending a written request with a demand draft of Rs. 600/- for General Candidates & Rs -555/- for SC/ST candidates along with caste certificate in four of THE COMMANDANT RIMC FUND, DRAWEE BRANCH, HDFC BANK, BALLUPUR CHOWK, DEHRADUN, (BANK CODE 1399), UTTARAKHAND. The address should be typed/written clearly in CAPITAL LETTERS with Pin Code and contact number. RIMC will NOT be responsible for any postal delay or loss in transit of prospectus caused by illegible or incomplete address. The delay on part of postal department is not the responsibility of RIMC.


Note:-


■The Application Form issued by RIMC only shall be valid. Application Forms locally printed/photocopied and without RIMC Hologram (seal) shall not be accepted.


Not refund of the application fee will be done under any condition.


4. Documents:- 

Applications are to be submitted in duplicate. The documents which are required! to be attached with Application Form are as under


a. Birth Certificate (issued by municipal Corporation/gram Panchayat).


b. Domicile Certificate of the Candidate.


c. SC/ST Certificate (where applicable).


d. A certificate from the Principal of the current School in which the student is studying, with photograph attested stating the date of birth (as per the school records) and the class in which the candidate is studying to be submitted in original.


e. Photocopy of Aadhar Card of the Candidate (both sides) is mandatory requirement failing which application will be rejected.

EXAM TIME TABLE



f. Two passport size photographs


Note: Application Form should reach the Commissioner, Maharashtra State Council of Examination, Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832- A Final Plot No.178, 179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune -411004 by 30th September, 2024 fulfilled as per the norms.


=================


माहितीपत्रक PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील PDF DOWNLOAD या बटणावर क्लिक करा




==================

प्रज्ञाशो परीक्षा (TALENT SEARCH EXAM

 स्कॉशि परीक्षा / नवो परीक्षा TESTS सोडवण्यासाठी खालील इयत्तांच्या नावांवर क्लिक करा.

पहिली

दुसरी

तिसरी

चौथी

पाचवी

सहावी

सातवी

आठवी

 

-------------------------------------

नवनवीन माहिती/PDF/ONLINE टेस्टस/VIDEOS/शैक्षणिक माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.

-------------------------



========================





 मो. रा. वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध....


मो. रा. वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.

----------------------------------------

तुम्हाला दररोज टेस्ट्स मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.



 सरळसेवा गट क मधील सर्व पदे MPSC कडे देण्यात आले आहेत.

 त्याबाबत अधिकृत शासन निर्णय वाचण्यासाठी/ PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा


----------------------------------------------------------


महाराष्ट्र शासनाने पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन विकासासाठी  'काजवा' ही 'संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका' बनवली आहे. 

ती PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर  क्लिक करा

       

----------------------


नवनवीन माहिती/PDF/ONLINE टेस्टस/VIDEOS/शैक्षणिक माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.




मैत्री गणिताशी १ ली ते ५ वी PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील इयत्तांच्या नावावर या बटणावर क्लिक करा.

-----------------

----------

----------

------------



-------------------------------------

नवनवीन माहिती/PDF/ONLINE टेस्टस/VIDEOS/शैक्षणिक माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खालील WHATS APP लोगोवर क्लिक करून WHATS APP GROUP ला ADD व्हा.

-------------------------

महाराष्ट्र शासनाने पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन विकासासाठी  'काजवा' ही 'संपूर्ण मराठी वाचन पुस्तिका' बनवली आहे. 

ती PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर  क्लिक करा

       

----------------------

नवोदय परीक्षा २०२५ फॉर्मविषयी संपूर्ण माहिती 👇👇


--------------

मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स  

 👇👇
-------------



                                           



दिनांक 23 जुलै 2024 रोजी झालेल्या आर्थिक वर्ष 2024- 25 साठीच बजेट मध्ये पगारदार नोकरदारांसाठी महत्वाचे असे  बदल करण्यात आले आहेत .............


1) जुन्या कर प्रणाली मध्ये काहीही बदल नाही. 

2) नवीन करप्रणाली मध्ये या पूर्वी 3 लाख ते 6 लाख या इन्कम वर 5 टक्के टॅक्स होता तो आता 3 लाख ते 7 लाख या रकमेवर 5 टक्के कर आकाराला जाईल. 

३) पूर्वी 10 % कर 6 लाख ते 9 लाख या उत्पन्ना वर होता तो आता 7 लाख ते 10 लाख एवढ्या उत्पन्ना वर घेतला जाईल .

४)  पूर्वी 9 ते 12 लाख रुपये उत्पन्नावर 15 टक्के कर लावला जाई तो आता 10 ते 12 लाख या उत्पन्नावर घेतला जाईल 12 ते 15 लाख यावर 20 टक्के मागीलप्रमाणेच व 15 लाख पेक्षा जास्त उत्पन्नावर 30 % कर आकारला जाइल यात बदल नाही.

3) स्टॅण्डर्ड डीडक्शन यापूर्वी 50000 रु होते ते 75000 रु करण्यात आले आहे. 


निर्मला सीतारामन यांचे BUDGET बाबतचे संसदेतील भाषण PDF 👇👇

----------------

 आर्थिक वर्ष 2024 - 25 साठी तुम्हाला income tax किती बसेल यासाठी खालील दिलेल्या चित्रावर क्लिक करा.


---------------------

 आपला कोणत्याही वर्षाचा INCOME TAX RETURN FUND चेक करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.


----------------------------


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.