नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेत भर....
नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हा मराठी भाषेतून दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच मराठी भाषेतून अभ्यासावर भर देण्याची गरज आहे, अशी भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नव्या धोरणाची अंमलबजावणी या वर्षापासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. यावर्षी अभिमत महाविद्यालयात, तर पुढील वर्षी सर्वच महाविद्यालयांत लागू होईल. त्यानुसार प्रादेशिक भाषेत शिक्षण ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
आतापर्यंत इंग्रजीत शिकविल्या जाणाऱ्या अवघड संकल्पना मातृभाषेतून सांगितल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्याचा निर्देशांक वाढेल, टक्केवारीच्या मागे लागलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण होईल खन्या अर्थानि ज्ञानार्जन होईल, अशी अपेक्षा आहे. मातृभाषेतून विज्ञानासह अन्य विषयावर भर दिला जाईल.
सहावीनंतर मानसिक चाचण्यांद्वारे मुलाच्या शिक्षणाच्या पुढील दिशा ठरविल्या जातील भाषा, गणित विज्ञानाच्या गुणवत्तेवर भर दिला जाईल. त्यासाठी मातृभाषा महत्त्वाची ठरेल.
महाराष्ट्रातील विद्या परीक्षेत झेंडा फडकवेल, अशी अपेक्षा आहे. त्याची तयारी बारावीपासून करायला हवी, अशी भूमिका तज्ञांनी व्यक्त केली आहे.