शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांतील फरक Difference Between Scientist and Technologist

 शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांतील फरक  


1) शास्त्रज्ञ (scientists) हे मूलभूत संशोधन करून नवनवीन शोध लावतात, तर तंत्रज्ञ (technocrats)  हे त्या संशोधनावर आधारित उपकरणे तयार करतात.


2) शास्त्रज्ञ हे सैध्दांतिक मांडणी करतात, तर तंत्रज्ञ त्या मांडणीचे उपायोजन करतात.


3) शास्त्रज्ञ मानवाला उत्क्रांत करतात, तर तंत्रज्ञ त्या उत्क्रांन्तीला बढावा देण्याचे काम करतात.


4) शास्त्रज्ञ विज्ञानाचे तत्वज्ञान निर्माण करतात, तर तंत्रज्ञ त्या विज्ञानाला प्रत्यक्षात मूर्त रूप द्यायचा प्रयत्न करतात.


5) शास्त्रज्ञ विश्वाला गवसणी घालतात, तर तंत्रज्ञ ती गवसणी सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञान तयार करण्याचे प्रयत्न करतात.


6) शास्त्रज्ञ हा दैववादी नसतो. पण तंत्रज्ञ मात्र दैववादी असू शकतो. उदाहरणार्थ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे निरीश्वरवादी होते, तर तंत्रज्ञ अब्दुल कलाम हे मात्र दैववादी होते.


            वरील गुणधर्माधारे आईनस्टाईनला शास्त्रज्ञ म्हणतात तर अब्दुल कलामांना तंत्रज्ञ. बरेचदा शास्त्रज्ञामध्ये तंत्रज्ञ दडलेला असतो, तर तंत्रज्ञामध्ये शास्त्रज्ञ. ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाची एवढी सरमिसळ झालेली असते की, आपण बरेचदा तंत्रज्ञालाच शास्त्रज्ञ म्हणतो. खरे म्हणजे दोघांनीही प्रगतीला हातभार लावलेला असतो. दोघात कुणीही सरस-निरस नसतो, पण तरीही शास्त्रज्ञाचे बोट धरूनच तंत्रज्ञाची वाटचाल सुरु असते, म्हणून शास्त्रज्ञ हाच खरा मानवी प्रगतीचा मार्गदर्शक असतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.