जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया 2022 करिता शिक्षकांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्वतः नोंद केलेल्या तारखेनुसार डेटा अंतिम केला आहे. बदली प्रक्रिया ही 30 जून 2022 या तारखेनुसार राबवली जाणार असल्याने 30 जून 2022 या तारखेपर्यंत जे शिक्षक बदलीपात्र व बदली अधिकार पात्र होत आहेत अशा शिक्षकांची यादी यापूर्वीच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने प्रसिद्ध केलेली आहे .
आज दि.18/11/2022 रोजी 👉विशेष संवर्ग भाग एक
👉विशेष संवर्ग भाग दोन
यामधील शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर सुविधा 20/11/2022 अखेर उपलब्ध असेल2 याची नोंद घ्यावी.
पोर्टलवर फॉर्म कसा भरावा याबाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून पाठवलेला VDO काळजीपूर्वक पाहावा.
👉 जे शिक्षक शासन निर्णय 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 1.8 यातील 1 ते 20 उपप्रकारात 30 जून 2022 पर्यंत येत असतील त्या सर्व शिक्षकांनी तसेच
👉 शिक्षक शासन निर्णय 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 1.9 यातील 1 ते 6 उपप्रकारात 30 जून 2022 पर्यंत येत असतील
अशाच शिक्षकांना संवर्ग 1 आणि 2 चा लाभ घेता येईल.
चुकीच्या पद्धतीने किंवा खोट्या माहितीच्या आधारे फॉर्म भरल्यास शासन परिपत्रकानुसार संबंधित शिक्षकांचा अर्ज बदली प्रक्रियेतून डिलीट करण्यात येईल याची स्पष्ट कल्पना सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून देण्यात याव्यात.
सदरचे फॉर्म भरल्यानंतर
👉 विशेष संवर्ग 1
👉विशेष संवर्ग 2
👉 बदलीपात्र
👉बदली अधिकारपात्र
शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
महत्वाची सूचना
2022 च्या बदल्या दिनांक 30 जून 2022 या तारखेनुसार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तारखेला सिस्टिमला व्हॅलीडेशन असणार आहे.
बदली बाबत आपणास कोणतीही शंका असल्यास दि.07/04/2021 चा शासन निर्णय व ग्राम विकास विभागामार्फत वेळोवेळी आलेली सूचना पत्रे काळजीपूर्वक वाचावीत तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO काळजीपूर्वक पाहावेत/ऐकावेत.
शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग - १ व विशेष संवर्ग भाग - २ अर्ज कसा भरावा? यासाठी VIDEO पाहण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.....