पुस्तकांसोबतच वह्यांची पाने असावीत कि नसावीत याबाबत बालभारती प्रश्नावली || Balbharti Questionnaire on whether or not there should be pages of notebooks along with the books

 


Dear Sir/Madam,

पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केलेली आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याची निकड जाणून घेण्यासाठी आपल्या कामातून पाच मिनिटे वेळ यासाठी काढून ही प्रश्नावली जरूर भरून पाठवावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या इतर शिक्षकांनादेखील ही प्रश्नावली भरण्यास प्रवृत्त करावे, ही विनंती. एखाद्या वेळेस हा निर्णय महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेसाठी दूरगामी परिणाम करणारा ठरेल. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

Please click the link below to register your opinion.

Link to register your opinion
(प्रश्नावालीमध्ये माहिती भरण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा....)




Thanks

From,
Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research, Balbharati, Pune
PLEASE DO NOT REPLY TO THIS MAIL. THIS IS AN AUTO GENERATED MAIL AND REPLIES TO THIS EMAIL ID ARE NOT ATTENDED TO.

टीप  - (वरील माहिती फक्त शिक्षकांपर्यंत पोहीचावी हाच एकमेव उद्देश आहे. बाकी यामागे दुसरा कोणताही हेतू नाही... - tEAM mISSION sCHOLAR


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.