अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह, औरंगाबाद.
प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याबाबतीतचा प्रेस नोट नुकताच जाहीर करण्यात आली आहे.
प्रेस नोट :
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शासकीय विज्ञान संस्था संचलित, हनुमान टेकडीजवळ, औरंगाबाद येथील परीसरात अल्पसंख्यांक मुलीचे वसतिगृहात (१००) फक्त मुलीचे प्रवेश करावयाचे आहेत.
सदर अल्पसंख्यांक मुलीचे वसतिगृह हे शासकीय विज्ञान संस्था परिसर, निपट निरंजन नगर, लेणी मार्ग, बिबिका मकबन्याच्या मागे, औरंगाबाद या परिसरामध्ये आहे. अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहामध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थीनी प्रवेश घेऊ शकतात. तसेच शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थीनी प्रवेश घेऊ शकतात.
अल्पसंख्यांक विद्यार्थीनींसाठी एकुण ७० जागा (७० जागांपैकी मुस्लीम मुलींसाठी ३५, बौध्द मुलींसाठी २१, ख्रिश्चन मुलींसाठी ०६, जैन मुलीसाठी ०६, शिख व पारसी मुलींसाठी प्रत्येकी ०१ जागा राखीव असेल.) व बिगर अल्पसंख्यांक समाजामधील एकुण ३० जागांकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
अल्पसंख्यांक मुलीच्या वसतिगृहातील विद्यार्थीनीसाठी सोयी व सुविधा:
१) सुसज्ज व सुशोभीत चार मजली इमारत
२) १०० मुलीच्या राहण्याची उत्तम सोय
३) अल्पसंख्यांक मुलीसाठी ७० टक्के व इतरांसाठी ३० टक्के जागा
४) २४ तास गरम पाण्याची व्यवस्था
५) शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
६) प्रत्येक विद्यार्थीनीसाठी (पलंग, गादी, खुची, टेबल व टेबल लॅम्प)
७) प्रत्येक विद्यार्थीनीसाठी भोजनालय (मेस) ची व्यवस्था
८) वसतिगृहामध्ये विद्यार्थीनीसाटी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
९) प्रवेश शुल्क प्रत्येक सत्रासाठी रु.२३५०/- व अनामत रक्कम रु.५००/
१०) वेंडींग मशीनची सुविधा उपलब्ध.
अल्पसंख्यांक समाजातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असल्यास प्रवेश शुल्क माफ राहील.
तसेच वसतिगृहातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थीनींना शासन नियमाप्रमाणे शासनामार्फत पोषण आहार भत्ता म्हणुन दरमाहा रु.३,५००/- थेट त्यांच्या संलग्नीत बँक खात्यात लाभ मिळेल.
विद्यार्थिनांनी अधिक माहितीसाटी अल्पसंख्यांक मुलीचे वसतिगृह औरंगाबाद www.minoritygirlshostel.in या संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन किया कार्यालयातून प्रवेश अर्ज विहोत शुल्क भरुन घेण्यात यावा.
अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक : १२/०९/२०२२ हा राहील.