अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

 




* अंमलबजावणी कार्यालय :


समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद


* उद्दीष्ट व स्वरुप :

भंगी व्यवसाय, मेहतर व्यवसाय, कातडी सालणे, चामडी कमावणे, हे व्यवसाय करणाऱ्या | पालकांच्या मुलांना मॅट्रीकपुर्व शिक्षण घेता यावे या उद्देशाने अशा मुलांना विद्यावेतन दिले जाते. सदर योजना केंन्द्र शासन निर्णय क्र. इबीसी-१०७७/१४४१९४/डी-५, दि. ४ ऑक्टोबर, १९७७ अन्वये कार्यान्वित आहे.


| अटी व शर्ती :


१. लाभधारकाचे पालक अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक


२. उत्पन्नाची अट नाही


३. कुटूंबातील दोन वर्षा पेक्षा जास्त मुलांना लाभ अनुज्ञेय नाही.


४. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यास लाभ अनुज्ञेय नाही.


 लाभाचे स्वरुप :


अ) सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यांना खालील दराने शिष्यवृत्ती देण्यात येते.

शिष्यवृत्ती देण्यात येते.


इयत्ता ३ री ते ८ वी - रु.३००/- द.म. (१० महिन्याकरीता)


इयत्ता ९ वी ते १० वी - रु.३७५/- द.म. (१० महिन्याकरीता)


ब) बिगर वसतिगृहात राहणारे विद्यार्थी..


इयत्ता १ ली ते ५ वी - रु.४०/- द.म. (१० महिन्याकरीता)


इयत्ता ६ वी ते ८ वी - रु.६०/- द.म. (१० महिन्याकरीता)


इयत्ता ९ वी ते १० वी रु.७५/- द.म. (१० महिन्याकरीता)


या शिवाय अनिवासी अधिक रु.५५०/- व अनिवासी प्रतिविद्यार्थी रु.६००/-प्रमाणे विशेष


प्रोत्सहान भत्ता देण्यात येतो.


संपर्क (अर्ज कोणाकडे करावा) :


संबधित मान्यताप्राप्त संस्थेकडे व संबधित संस्थेने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे करावा.

*****************************

अर्जाचा नमुना PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील PDF DOWNLOAD या बटणावर क्लिक करा.....






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.