|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
& मराठी &
प्रश्न : संगीताकाकू व त्यांच्या मैत्रिणी देवदर्शनाला गेल्या
होत्या. या वाक्यातील उद्देश भाग ओळखा.
(1) देवदर्शनाला गेल्या होत्या
(2) संगीताकाकू
(3) संगीताकाकू व त्यांच्या मैत्रिणी
(4) गेल्या
होत्या
===============
स्पष्टीकरण :~
वाक्यात संगीताकाकू व त्यांच्या मैत्रिणींविषयी सांगितले आहे
म्हणून ‘संगीताकाकू व त्यांच्या मैत्रिणी’ हा उद्देश भाग आहे.
म्हणून उत्तर पर्याय क्र.(3)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================