|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
6 बुद्धिमत्ता चाचणी
6
प्रश्न : ‘मुख्याध्यापकांनी मुलांना ‘माझा देश’ या विषयावर दहा ओळी निबंध लिहिण्यास सांगितला.’ या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या तीन अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ?
(1) 1
(2) 2
(3) 3
(4) 4
स्पष्टीकरण :~
दोन अक्षरी शब्द – माझा , देश, दहा, ओळी = 4;
तीन अक्षरी शब्द – मुलांना, निबंध = 2.
म्हणून दोन अक्षरी शब्दांची संख्या तीन अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा 2 ने जास्त आहे.
म्हणून उत्तर पर्याय क्र.(2)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================