जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली पोर्टल log in साठी उपलब्ध...

 





जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली पोर्टल log in साठी उपलब्ध...

LOG IN करून आपली माहिती  update करण्यासाठी खालील Log in बटणावर क्लिक्क करा.

---------------


जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सन 2022

1.   https://ott.mahardd.in/ या  बदली पोर्टल ला आपला मोबाईल टाकून OTP मिळाल्यानंतर लॉगिन केल्यावर आपल्या समोर सूचना येतील त्या काळजीपूर्वक वाचा.

2. डाव्या बाजूला मेनू मध्ये Profile दिसेल त्यावर क्लिक करा.
3. Profile   मध्ये दोन भाग आहेत.1. Personal details  व 2.employment details.

4. शिक्षकांना profile update करण्याची सुविधा दिनांक 13/ 6/ 2022  पासून ते दिनांक 20/ 6/ 2022 पर्यंतच आहे.

5.वरील कालावधीत सर्व शिक्षकांनी आपले profile update करणे अनिवार्य आहे.

6. Personal details मधील माहिती आपल्याला बदलता येणार नाही.

7. Employment details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करून अचूक काळजीपूर्वक बिनचूक भरायची आहे.

8. Date of appointment - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व आंतर जिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा (ऑर्डर वरील दिनांक भरू नये)

9. Cast category -  Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.

10. Appointment category - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा आपल्या मूळ नियुक्ती आदेशावर दिलेली आहे.त्यानुसारच नोंद करणे

11. Current district joining date - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व  आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा (ऑर्डर वरील दिनांक भरू नये)

12. Udise  code of current School - शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर चेक करूनच काळजीपूर्वक बिनचूक भरावा.

13. Current School joining date - यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे (ऑर्डर वरील दिनांक भरू नये)

14. Current teacher type - Graduate /  Under graduate यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा.

15. Teaching subtype  यामध्ये graduate teacher असेल त्यांनी भाषा/ गणित -विज्ञान /समाजशास्त्र यापैकी एक आपल्या आदेशात नमूद असलेला विषय सिलेक्ट करावा

16. Teaching Medium - या मध्ये Marathi/ Urdu आपल्या शाळेचे माध्यम निवडा.

17.Last Transfer Category - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होऊन आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.(2019 मधील अवघड व सर्वसाधारण क्षेत्र)

18.Last Transfer Type - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होऊन आलात तो प्रकार ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा लागू नसल्यास NA निवडा.

19.Have you been suspended in last 10 years ?
आपण मागील 10 वर्षात निलंबित झाले असल्यास yes नमूद करावे.

टीप- बदली प्रक्रिया माहिती जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे शासन निर्णय अभ्यासून स्वतःसाठी योग्य पर्याय स्वतः निवडणे , माहिती व फॉर्म विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे.

-----------------

पोर्टल वापराबाबतचे शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील PDF DOWNLOAD या बटणावर क्लिक करा.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.