सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापंक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये सदरच्या नोंदणी केलेल्या सर्व शिक्षक /मुख्याध्यापक / प्राध्यापक/प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक खालीलप्रमाणे सुचना सर्व प्रशिक्षणार्थी यांना अवगत करण्यात यावेत.
प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यास सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे
या लिंकवर क्लिक करून सुरु करता येईल.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यास आवश्यक युजर आयडी व पासवर्ड प्रशिक्षणार्थ्याने नावनोंदणी करत असताना पुरविलेल्या मेल आय.डी वर मेल प्राप्त होईल. ज्या प्रशिक्षाणार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर सदर तपशील प्राप्त होणार नाहीत,
त्यांना https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर तक्रार नोंदविण्याची सुविधा दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध होईल. अशा प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण पूर्ण करण्याची वेळ देखील वाढवून देण्यात येईल.
• सदरचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १ जुन २०२२ पासून १ जुलै,२०२२ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
• सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ३० दिवसांच्या कालावधी मध्येच प्रशिक्षणार्थी याने पूर्ण करणे अनिवार्य आहे. तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही, याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून सदरच्या अॅपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल.
APP डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर CLICK करा.
APP वापराबाबतची माहिती खालीलप्रमाणे -
वरिष्ठ व निवडश्रेणी बाबतचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय व माहिती वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.