जगात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सऍपची ओळख. सुरुवातीला केवळ चॅटिंगपुरते मर्यादित असलेले हे ऍप आता अनेक कारणांसाठी वापरले जाऊ लागले आहे. त्यासाठी नवनवीन फीचर्सही व्हॉट्स ऍपवर मिळायला लागले. असेच काही नवे फीचर्स व्हॉट्सऍपने नुकतेच जारी केले असून, त्यामुळे व्हॉट्सऍप वापरतानाच्या काही मर्यादा दूर झाल्या आहेत.
💥 रिऍक्शन ईमोजीस 💥
(टेलिग्राम, आयमेसेज एवढंच नव्हे, तर इन्स्टाग्रामवर उपलब्ध असलेलं रिअॅक्शन इमोजीस हे फीचर आता व्हॉट्स अॅपवरदेखील उपलब्ध झाले आहे. या फीचरमुळे युजर्सना एखाद्या मेसेजला काही निवडक ईमोजीसने लगेचच रिअॅक्ट करता येणार आहे. सध्या या फीचरमध्ये लाईक, लव्ह, लाफ, सरप्राईज, सँड आणि थँक्स हे सहा इमोजीस असून, लवकरच इतरही उपलब्ध होतील. हे फीचर वापरण्याची कुठल्याही एखाद्या मेसेजवर एक-दोन सेकंद प्रेस केल्यास वरील सहा इमोजीसचे पॉप-अप स्क्रीनवर येतील. त्यापैकी गरजेनुसार तुम्ही वापरू शकता.
💥 2GB डेटा ट्रान्सफर 💥
व्हॉटसऍपवर आतापर्यंत 100 एमबीपर्यंत डेटा शेअर करता येत होता. त्यामुळे मोठ्या साईजचे व्हिडिओ किंवा फाईल्स पाठवताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेता व्हॉट्सऍपने आता डेटा ट्रान्सफरची मर्यादा तब्बल 2 जीबीपर्यंत वाढवली आहे. हा 2 जीबीपर्यंत शेअर होणारा डेटा हा एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असेल.
💥 32 जणाचा संवाद 💥
मोबाईल नेटवर्क नसल्यास आपण सहजपणे वाय-फायच्या मदतीने व्हॉट्सऍपवरून व्हॉईस कॉल करण्यास प्राधान्य देतो. सुरुवातीला दोघांमध्ये होणारा व्हॉईस कॉलवरील संवाद हळूहळू अपग्रेड होत वाढत गेला. मोबाईल नेटवर्क नसतानाही केवळ वायफायच्या मदतीने व्हॉट्सऍप व्हॉईसकॉलच्या मदतीने अनेक मित्र मैत्रिणी, नातेवाईक एकत्रितपणे व्हॉट्सऍप कॉलिंगचा आनंद लुटतात. युजर्सचा हा आनंद आता आणखी वाढणार आहे. कारण व्हॉट्सअपवरून आता आठ-दहा नाहीत, तर तब्बल 32 जण एकत्रितपणे व्हॉईस कॉल करू शकतील.
💥 512 जणांचा मोठ्ठा ग्रुप 💥
तुमच्या आमच्या व्हॉट्सऍपवर शाळा महाविद्यालयांतील मित्र-मैत्रिणींचा, ऑफिसमधील सहकाऱ्यांचा, नातेवाईकांचा तसेच इतर अनेक ग्रुप असतात. ग्रुपमधील सदस्यांची संख्या अधिक असल्याचे कुठल्या ग्रुपमध्ये कुठला मेसेज आला किंवा कुठला मेसेज पाठवला, हे कळत नाही. त्यामुळे एकाचवेळी सर्वांना मेसेज किंवा एखादी फाईल पाठवायची असल्यास आता चिंता राहणार नाही. कारण व्हॉट्सऍपने कम्युनिटी फीचर आणले असून, तुम्हाला हव्या असलेल्या अनेक ग्रुपला एकत्र करता येईल. म्हणजेच, ग्रुपचा ग्रुप तयार करता येईल व सर्वांना एकाचवेळी मेसेज ब्रॉडकास्ट करता येईल.