तुमच्या नावावर कोणी सिमकार्ड घेतलंय ? हे आता कळेल अवघ्या काही सेकंदात... !
तुमच्या सिम कार्डचा दुरुपयोग
देखील होऊ शकतो. आधार कार्ड वापरून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. खासकरून, आधार कार्डवर सिम कार्ड घेतले जातात व याबाबत आधार कार्डधारकाला माहिती देखील
नसते. तुमच्या आधार कार्डवर देखील किती नंबर जारी करण्यात आले आहेत, हे जाणून घेण्यासाठी सोपी प्रोसेस उपलब्ध आहे. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.
घरबसल्या मिळेल तुमच्या आधारवर सुरू
असलेल्या सिम कार्डची माहिती
एक आधार कार्डवर तुम्ही १८ सिम कार्ड घेऊ
शकता.
टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायनुसार, एका आधारवर नागरिक १८ सिम कार्ड घेऊ शकतात.
तुमच्या आधारवर किती सिम कार्ड अॅक्टिव्ह
आहेत, हे जाणून घेण्यासाठी -...
1) तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे
गरजेचे आहे. तसेच,
2) सर्वात प्रथम तुम्हाला यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in/ वर जावे लागेल.
uidai च्या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील click here या बटणावर क्लिक करा.
3) येथे तुम्हाला 'गेट आधार'वर जावून 'डाउनलोड आधार' पर्यायावर क्लिक करायचे आहे.
4) आता view more या पर्यायावर क्लिक
करा.
5) आता तुम्हाला 'आधार ऑनलाइन सर्विस'वर जायचे आहे.
6) त्यानंतर 'Aadhaar Authentication History' वर क्लिक करता.
7) पुढे Where can
a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर
क्लिक
करायचे आहे.
8) आता तुम्हाला तुमचा आधार नंबर
आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे.
9) त्यानंतर सेंड ओटीपी'वर क्लिक
करा.
10) आता 'AuthenticationType'वर ऑल निवडून ज्या तारखेची
माहिती हवी आहे, ती निवडा.
11) आता तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी भरा.
12) ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आधारवर अॅक्टिव्ह असलेल्या
सिम कार्डची माहिती मिळेल.
13) तुम्हाला माहित नसलेला मोबाइल नंबर अॅक्टिव्ह असल्यास
ट्रायकडे बंद करण्यासाठी तक्रार देखील करू शकता.
14) याशिवाय, तुम्ही tafcop.dgtelecom.gov.in वर जावून देखील याबाबत
माहिती घेऊ शकता.
tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील click here या बटणावर क्लिक करा.
मात्र, ही सुविधा ठराविक राज्यातच
उपलब्ध आहे.