शनी मंगळ गुरु शुक्र एकाच रेषेत येणार Saturn Mars Jupiter Venus in the same line

              


         

                शनी, मंगळ, गुरु, शुक्र एकाच रेषेत येणार

 

सूर्यमालेतील प्रमुख चार ग्रह आता अंतराळात एकाच रेषेत दिसणार आहेत. अंतराळातील हे दृश्य अत्यंत अद्भुत असणार आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेकडील तमाम देश हे दृश्य पाहू शकतील. भारतातूनही हा खगोलीय सोहळा शहर अथवा गावांतून दिसणार आहे. मात्र, त्यावेळी आकाश स्वच्छ असावे इतकेच. १७ एप्रिल २०२२ पासून अवकाशात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू या ग्रहांनी एका रेषेत येण्यास सुरुवात केली आहे. २० एप्रिल २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास हे चारही ग्रह एकाच रेषेत आलेले दिसतील. यासाठी सूर्योदय होण्यापूर्वी पूर्व दिशेला आकाशात निरीक्षण करावे लागणार आहे.

 

जर आकाश स्वच्छ असेल तर २० एप्रिल रोजी पहाटेस पूर्व दिशेला सर्वप्रथम डाव्या बाजूने गुरू, शुक्र, मंगळ व शनी अशा क्रमाने हे ग्रह एकाच रेषेत आलेले दिसतील. ग्रहांच्या संमेलनात गुरुला पाहणे जरा अवघड आहे. कारण, तो होराईजनच्या वरच्या दिशेला असेल. (होराईजन म्हणजे अनेक प्रकारच्या प्रकाशांचा संगम. यामुळे ग्रहांवरचा प्रकाश कमी होतो.)

 

मार्चच्या अखेरपासूनच शनी, मंगळ आणि शुक्र हे कधी कधी एकत्र, तर कधी वेगळे दिसत आहेत. एप्रिलच्या मध्यास या तीन ग्रहांच्या बैठकीत गुरूही सहभागी होत आहे. २३ एप्रिल रोजी तर यामध्ये आपला चंद्रही सहभागी होत असून, हा एक अद्भुत अवकाशीय नजारा असेल. अशी संधी पुन्हा याचवर्षी २४ जून रोजी येणार आहे. त्यावेळी बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून आणि युरेनस हे एकाच रेषेत आलेले असतील.

 


सविस्तर वाचण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.


-----------------------
हे हि वाचा -


-----------------

नवोदय गणित 800+ प्रश्न PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.