१ मेपासून लोकसेवा हमी कायद्यात शिक्षण विभागाचा समावेश
महाराष्ट्र लोकसेवा हक्क
अधिनियम २०१५ अन्वये महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सेवा आता
लोकसेवा हक्क अधिनियमात अंतर्भूत करण्यात येत असल्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज
मांढरे यांनी नुकतेच जारी केले. त्यामुळे शिक्षण विभागही आता लोकसेवा हक्क
अधिनियमांतर्गत येत्या १ मेपासून अंतर्भूत होणार असल्यामुळे शिक्षण विभागातील
अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक सुरू झालेली आहे. कारण विशिष्ट मुदतीत सेवा देणे बंधनकारक झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधत
शिक्षण आयुक्तांनी भेट दिली आहे.
नागरिकांना विशिष्ट मुदतीत त्यांना हव्या असलेल्या सेवा
मिळाव्यात, शासकीय कार्यालयातील
कारभार पारदर्शक व्हावा. दफ्तरदिरंगाई व भ्रष्टाचाराला संपविणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
शिक्षणक्षेत्रातही आता लोकसेवा हमी कायदा येत्या महाराष्ट्रदिनापासून प्रभावीपणे
लागू केल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकसेवा हमी कायद्यामुळे विद्यार्थ्यांना होणारे लाभ
बोनाफाइड प्रमाणपत्र, द्वितीय गुणपत्रिका,
शाळा सोडल्याचा
दाखला, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतिस्वाक्षरी, योग्यता प्रमाणपत्र,
समकक्षता प्रस्ताव, जात प्रमाणपत्र, जन्मतारीख, नाव व तत्सम बदल,
राजीव गांधी
अपघात सानुग्रह, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या
गुणपत्रिकेतील बदल, शिष्यवृत्ती परीक्षांचे
लाभ मिळणे सोयीचे होईल.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही होणार फायदा
नियमित वेतन देयक सादर करणे, भविष्य निर्वाह
निधी, वैद्यकीय कारणास्तव अग्री मंजुरी, वैद्यकीय खर्चाचे देयक, सेवानिवृत्तीची प्रकरणे,
थकीत वेतन देयक, वैयक्तिक मान्यता, मुख्याध्यापक पदोन्नती, वरिष्ठ व निवड श्रेणी,
शालार्थ आयडी देणे, शालार्थ नाव समाविष्ट करणे,
सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य निर्वाह निधी रक्कम, रजा रोखीकरण, अतिरिक्त शिक्षक समायोजन, प्रभारी मुख्याध्यापक मान्यता, सेवाखंड क्षमापित,
सेवा पुस्तक पडताळणी, विनाअनुदानवरून अनुदानित
तत्त्वावर बदली, सर्वसाधारण बदली, जी.पी.
एफ., डी.सी.पी.एस. व एन.पी.एस.च्या पावत्या इत्यादी सेवा मिळण्यासाठी
शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागत असे. या सर्व सेवा आता विशिष्ट
मुदतीत मिळणार आहेत.
Source – DAINIK PUNY NAGARI
नेमके लोकसेवा हमी कायदा आहे तरी काय ?
वाचा सविस्तर -