भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करणेबाबत.


    
       



         भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी होरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.


        भीमराव रामजी आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, क्रांतीच्या घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या व 

कामगारांच्य ांचे समर्थन केले. ते स्वांतत्र्यपूर्व Win भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली, त्यांच्यामध्ये लढाऊवृत्ती निर्माण करुन समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना,पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने मूलभूत कार्य अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजामधील तळागाळातील व्यक्तीचा प्रामुख्याने विचार केला. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा प्रेरणादायी संदेश दिला. विविध भाषा, धर्म, पंथ व जातीमध्ये विभागलेल्या भारताला संविधानाच्या माध्यमातून एक देश म्हणून एकसंध केले.

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड होती. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकत नाही, असे त्यांचे मत होते. उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी ‘राजगृह' नावाचे घर दादर, मुंबई येथे बांधले. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात विविध विषयांवरील हजारो दुर्मीळ ग्रंथांचा समावेश आहे. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या व एक रुपयाची भाकरी घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल, हे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत.

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल रोजी आयोजित करावयाचे कार्यक्रम खालीलप्रमाणे -



शासन निर्णय  डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
विद्यार्थी व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून सादरीकरणाचा दोन ते तीन मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) #muknayakया HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावे. व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ (वरील लिंकवर क्लिक करा.)इथे देण्यात यावी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत उत्कृष्ठ उपक्रमांचा यथोचित सन्मान करण्यात येईल.

       







आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)

WHATS APP GROUP'S =  (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)

WHATS APP GROUP'S


  

मिशन स्कॉलर       13

मिशन स्कॉलर       14

मिशन स्कॉलर       15

मिशन स्कॉलर       16

मिशन स्कॉलर       17

मिशन स्कॉलर       18

 

 

 

 

मिशन स्कॉलर       19

मिशन स्कॉलर      20

मिशन स्कॉलर       21

मिशन स्कॉलर       22

मिशन स्कॉलर       23

मिशन स्कॉलर      24

 

 


 

मिशन स्कॉलर       25

मिशन स्कॉलर       26

मिशन स्कॉलर       27

मिशन स्कॉलर       28

मिशन स्कॉलर       29

मिशन स्कॉलर       30






हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :


MISSION ENGLISH   (इंग्रजी तयारी)

CLICK HERE


स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित  संपूर्ण तयारी

CLICK HERE


जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)

येथे क्लिक करा.


मिशन स्कॉलरशिप 5 वी 

येथे क्लिक करा.


गणित : सूत्रे, नियम, व्याख्या

येथे क्लिक करा.


प्रज्ञाशोध परीक्षा सराव

येथे क्लिक करा.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.