शिक्षक बदल्या TEACHER TRANSFER UPDATE 2022 |VC 17.03.2022 मधील महत्त्वाचे अपडेट


 

✳️ शिक्षक बदल्या 2022|VC 7.03.2022 मधील महत्त्वाचे अपडेट 



✳️ संदर्भाधीन शासन निर्णय, शासनपत्रामध्ये दिलेल्या निर्देशानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत तसेच सदर बदलीच्या अनुषंगाने येणार्या अन्य समस्यांबाबत अतिरिक्त मुख्य सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली  दिनांक 17.3.2022 रोजी दुपाटी 4.00 वा. V.C.  आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती.


✳️ सदर  बैठकीमध्ये Teacher transfer portal ची चाचणी घेण्यात आली

याच portal च्या माध्यमातून शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत

✳️ Teacher transfer portal वर शिक्षकांची माहिती खालील प्रमाणे अपडेट केली जाईल

➡️ Teacher transfer portal वर  phase 1 मध्ये teacher data updation यामध्ये सर्व शिक्षकांना स्वतःची वैयक्तिक माहिती मोबाईल नंबर व ओटीपी च्या माध्यमातून login करून भरावयाची आहे

➡️ यामधील employee details मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरलेली असेल त्यामध्ये शिक्षक कोणतेही बदल करू शकणार नाहीत

➡️ परंतु  employment details यामध्ये आपण आपली कार्यरत शाळेतील तपशील, एकूण सेवेचा तपशील ,तसेच इतर सेवा संबंधी माहिती बदलू शकतो किंवा नवीन add करू शकतो

➡️ संपूर्ण माहिती तपासून submit केल्यानंतर ही माहिती मान्यते करीता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविली जाईल 

➡️ गटशिक्षणाधिकारी हे संबंधित शिक्षकांची माहिती transfer portal वर लॉगिन करून पाहू शकतात अथवा काही चुकीची माहिती असल्यास दुरुस्त करू शकतात 

➡️ संबंधित शिक्षकांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी verify केल्यानंतर ही माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवली जाईल 

➡️ संबंधित माहिती शिक्षक transfer portal वर login करून पाहू शकतात

➡️ गटशिक्षणाधिकारी यांनी दुरुस्त केलेली माहिती शिक्षकास मान्य नसल्यास  त्या संदर्भात शिक्षक  शिक्षणाधिकारी यांच्याकडे portal वर online  अपील करू शकतात 

➡️ यामध्ये  शिक्षणाधिकारी transfer portal वर login करून जिल्ह्यातील संपूर्ण  शिक्षकाची माहिती व अपील पाहू शकतात शिक्षणाधिकारी सदर माहितीची शहानिशा करून बरोबर असल्यास submit करतील अथवा नव्याने बदल करायचा असल्यास बदल करून submit करतील 

➡️ अशाप्रकारे शिक्षणाधिकारी यांनी बदल केलेले शिक्षकांचे profile शिक्षक पुन्हा बदलू शकणार नाहीत 

ती माहिती  शिक्षकांना read only mode वर दिसेल

➡️ शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे update केलेले profile शिक्षक लॉगिन करून पाहू शकतात

➡️ संबंधित अपडेट केलेले प्रोफाइल  व माहिती शिक्षकांनी वाचावी व except करावी अशाप्रकारे शिक्षकांची except केलेली माहिती Teacher transfer portal वर अपडेट केली जाईल

➡️ Teacher transfer portal वर अपडेट केलेल्या माहितीच्या आधारे बदली प्रक्रिया राबवली जाईल


✳️ बदली प्रक्रिया राबविण्याकरिता VC च्या माध्यमातून खालील सूचना देण्यात आल्या

✳️ सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.

✳️ शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून शिक्षकांचा डाटा प्राप्त झाला असून शालार्थ तसेच सेवार्थ प्रणालीतील डाटा अद्ययावत नाही. सदरचा डाटा अद्ययावत करणे, 

➡️ 1) UDSIE अपडेट व दुरुस्ती करणे. अंतिम मुदत 25 मार्च 

➡️ 2) शाळा नोंदणी व दुरुस्ती. अंतिम मुदत 25 मार्च 

➡️ 3) शिक्षक डाटा चेक करणे अंतिम मुदत 25 मार्च 

➡️ 4) अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करणे. अंतिम मुदत एप्रिल 2022

➡️ 5) user testing अंतिम मुदत 1 एप्रिल 

➡️ 6) समानीकरण धोरण जाहीर करणे अंतिम मुदत 25 एप्रिल

➡️ 7) टोस्टर अपडेट करणे. अंतिम मुदत 15 एप्रिल 

➡️ 8) आंतरजिल्हा बदली आदेश - बदली होईपर्यंत / सेवानिवृत्त होईपर्यंत वैध राहील.

➡️ 9) आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्ती साठी 10% ची अट राहील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.