राज्य
परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.
कोरोनामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे
२०२२ मध्ये होणारी परीक्षा नियोजित कालावधीत व्हावी. यादृष्टीने परीक्षा परिषदेचे
डिसेंबर महिन्यातच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली; परंतु टीईटी परीक्षेतील गैरप्रकारामुळे शिष्यवृत्ती
परीक्षा घेण्याची जबाबदारी कोणत्या एजन्सीला द्यावी, अशा प्रश्न निर्माण झाला होता. परीक्षा घेण्यास
एजन्सीच नसल्याने मार्च महिना संपत आला तरीही शिष्यवृत्ती परीक्षेबाबत कोणताही
निर्णय घेतला गेला नाही. मात्र, शासनाने विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्याबाबत
सूचना दिल्या आहेत, असे
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पुढील
काही दिवसांत परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेबाबतची सुधारित माहिती
प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे
अद्याप शिष्यवृत्ती
परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या - विद्यार्थ्यांना सात दिवस
ऑनलाइन अर्ज
भरण्यासाठी दिले जाणार आहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई करून सर्व परीक्षा
केंद्रावर
पोहोचविण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
परिणामी, शिष्यवृत्ती
परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस घेतली घेतली जाईल, असेही सुत्रांनी सांगितले.
(याबाबतची
UPDATED माहिती
परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल.)
सौजन्य - लोकमत वृत्तसमूह
आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)
WHATS APP GROUP'S = (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)
WHATS APP GROUP'S |
हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :
MISSION ENGLISH (इंग्रजी तयारी)
स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित संपूर्ण तयारी
जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)