पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड pahili te 8 vi mofat ganvesh




पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार : शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

 

            मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थी यांना मोफत शालेय गणवेश आणि लेखन साहित्य पुरवण्यात येते. मात्र, आता सरसकट १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना ते पुरवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी (ता. २) विधान परिषदेत दिली.

 

            आमदार श्री अमरनाथ राजूरकर,  श्री विक्रम काळे, श्री सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अनुसूचित जाती व जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जाती या गटातील इयत्ता १ ते ४ योच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवण्याची योजना १९८० मध्ये प्रारंभ केली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनुसूचित जाती, जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखाली पालकांची मुले यांना मोफत गणवेश देण्यात येतो. त्यासाठी प्रती विद्यार्थी ६०० असा खर्च येतो.

 

            या अंतर्गत ३६ लाख ७ हजार २९२ विद्यार्थ्याना लाभ देण्यात येतो आहे उर्वरित वंचित विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये १२ लाख ६० हजार ७४४ विद्यार्थी लाभधारक होतील. त्यासाठी ७५ कोटी ६४ लाख रुपये अधिकचा खर्च येणार असून सदर प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला आहे, असे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयाचे अनेक सामाजिक संस्थांनी स्वागत करून सरकारचे आभार मानले आहेत.

 सौजन्य : दिव्य मराठी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.