सध्या १२ वी १० वी च्या परीक्षा सुरु होत आहेत. तेंव्हा परीक्षेची तयारी कशी करावी किंवा परीक्षेला सामोरे कसे जावे याबद्दलचा लेख........
१) पहाटे उठून केलेला अभ्यास, रात्री जागून केलेल्या अभ्यासापेक्षा जास्त चांगला होतो.
२) पाठांतराचा अभ्यास पहाटे करा.
३) भुगोल, इतिहासासारखे विषय शब्द आणि चित्रांच्या स्वरूपात लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.
४) नोट्स लिहीतांना महत्त्वाचे शब्द किंवा KEY WORDS लिहून पाठ करा.
५) संपूर्ण उत्तर पाठ करु नका. मुद्दे आणि KEY WORDS पाठ करा.
६) एखादा मुद्दा किंवा शास्त्रीय संकल्पना समजायला वा लक्षात ठेवायला कठिण वाटत असेल तर त्याचा तक्ता किंवा DIAGRAM किंवा FLOW CHART तयार करा व स्मरणात ठेवा.
७) काही मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या अद्याक्षरांपासून एखादा शब्द तयार करा किंवा अद्याक्षरे लक्षात ठेवा.
८) अभ्यासाच्या विषयाचं प्लॅनिंग चाणाक्षपणे करा. केवळ विविध विषयांमधे दिवसाचे वा आठवड्याचे तास वाटून न घेता, आपण कोणत्या विषयात कशामधे कमी पडतोय हे ओळखून त्याला जास्त वेळ द्या.
९) मैदानी खेळांना रोज थोडा वेळ द्या.
१०) बाहेरचं खाण्याचं कमी करा.
११) T.V., COMPUTER, FACEBOOK मर्यादित वेळासाठीच वापरा, ज्याने पुन्हा ताजेतवाने होऊन अभ्यासाला बसू शकाल.
१२) सतत चॅट, SMS, FACEBOOK यांनी आपल्या नकळत मन व मेंदू विनाकारण ॲक्टिव राहतात व एकाग्रता, शांतता कमी होते.
१३) आहारात तेलकट, तळकट, मसालेदार खाणं कमीतकमी असू द्या. भरपूर फळं, भाज्या, दूध, कडधान्य खा.
१४) अभ्यासाला बसताना टेबलखुर्चीशी, स्वच्छ प्रकाश येणाऱ्या शांत ठिकाणी बसा. जवळ पाण्याची बाटली ठेवा.
१५) आकृती रेखाटन, नकाशांचा अभ्यास, यासाठी वेगळा वेळ नियोजित करा.
१६) ठराविक वेळेत प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करत रहा. त्यामुळे वेळेचं नियोजन करणं जमू लागेल.
१७) वेगवेगळ्या विषयातले अवघड वाटणारे मुद्दे भिंतीवर, सॉफ्टबोर्डवर, कपाटावर स्पष्टपणे दिसतील असे चिकटवून ठेवा.
सौजन्य : MKCL