सन २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १००% अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला.
प्रस्तावना -
जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपध्दती शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये विशद केली आहे. जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याकरिता संदर्भ क्र. २ अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सन २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी, सदर लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील स्तंभ क्र.३ नुसार तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूदीच्या ५०% म्हणजेच रकाना क्र.४ नुसार एकूण रु. ४५३०७३९०.५/-(रुपये चार हजार पाचशे तीस कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार पाचशे फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
९०६१,४७,८०
४५३०७३९०.५
३. सदर निधी वितरीत करण्याबाबतची कार्यवाही शासन निर्णय क्र. ३४१५/प्र.क्र.२७६/टिएनटी ६, दि.१९/०९/२०१९ मधील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरीत करण्यात यावा.
४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व अनौपचारिक संदर्भ क्र. २४९/२०२२/ व्यय ५, दि.२४/०२/२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०३२५१५०२४६९५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे. शासन निर्णय -
आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)
WHATS APP GROUP'S = (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)
WHATS APP GROUP'S |
हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :
MISSION ENGLISH (इंग्रजी तयारी)
स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित संपूर्ण तयारी
जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)