जिल्हांतर्गत बदल्या कोणत्या पद्धतीने होणार ? जिल्हांतर्गत बदली शासन आदेश 7 april 2021 स्पष्टीकरण


 
जिल्हांतर्गत बदल्या कोणत्या पद्धतीने होणार ?

जिल्हांतर्गत बदली  शासन आदेश 7 april 2021 स्पष्टीकरण  सर्व मुद्दे समाविष्ट :


माहिती  सौजन्य : श्री संजय नागे सर दर्यापूर  (97 67 39 77 07)








 ✳️जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया 2022 ही 7 एप्रिल 2021 च्या शासन आदेशानुसारच होईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले त्यामुळे सदर शासन आदेशात सध्यातरी कोणताही बदल संभवत नाही

 

🔴जिल्हांतर्गत बदल्याबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण

 

✳️बदल्या साठी सेवाजेष्ठता तारीख 31 मे अखेर धरण्यात येईल. 

 

✳ ️30 शाळांचा पसंतीक्रम भरुन देता येईल. 

 

✳️विशेष संवर्ग शिक्षक भाग 12 मधून बदली झाल्यास पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. 

 

✳️सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील. 

 

✳️ संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्या बदल्या पूर्वी प्रसिद्ध करणार. 

 

✳️अवघड शाळा निवडीसाठी कमीतकमी तीन निकष पूर्ण असणे आवश्यक. 

 

 

संवर्ग 1- विशेष संवर्ग शिक्षक भाग 1  :

 

यामध्ये दिव्यांग शिक्षक, दुर्धर आजारी शिक्षक, विधवा शिक्षिका, कुमारिका शिक्षिका, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला, 53 वर्षे वरील शिक्षक, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य. 

 

▶️ संवर्ग 2- विशेष संवर्ग शिक्षक भाग 2

 

पती - पत्नी एकत्रीकरण 

 

1) दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक

 

2) एक जिल्हा परिषद दुसरा राज्य शासकीय कर्मचारी

 

3) एक जिल्हा परिषद दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी

 

4) एक जिल्हा परिषद दुसरा स्वायत्त संस्थेत कर्मचारी

 

5) एक जिल्हा परिषद दुसरा केंद्र/राज्य सार्वजनिक उपक्रमात कर्मचारी

 

6) एक जिल्हा परिषद दुसरा अनुदानित संस्थेतील शिक्षक/कर्मचारी

 

▶️ संवर्ग 3 - बदली अधिकार प्राप्त शिक्षक कोण

 

बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे असे शिक्षक. 

 

▶️ संवर्ग 4 -  बदलीस पात्र शिक्षक कोण

 

बदलीस पात्र शिक्षकांच्या व्याख्या :

 

बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग 10 वर्षे सेवा झाली आहे आणि विद्यमान शाळेत 5 वर्षे पूर्ण झाली आहेत असे शिक्षक. तथापी अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. म्हणजेच अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरतांना सर्वसाधारण क्षेत्रातील 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांच्या सेवा जेष्ठ तेने भरण्यात येतील त्यांना शाळेतील सेवेची अट लागू राहणार नाही 

 

तसेच अवघड / पेसा क्षेत्रातील सर्व जागा भरणे शासन निर्णयानुसार अनिवार्य असल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रातील  10 वर्षे सेवेच्या अटीनुसार रिक्त पदे भरणे शक्य न झाल्यास 10 वर्षे सेवेची अट कमी होऊ शकते सदर बदलान्वये सुगम क्षेत्रातील (संवर्ग 4) मधील शिक्षकांवर अन्याय होवू शकतो.

 

🔴जिल्हांतर्गत बदल्या कशा होतील

 

1) जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे. 

 

2) प्रशिक्षण - बदली संदर्भात शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण

 

3) शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे. 

 

4) शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम भरुन घेणे. 

 

5) प्रत्यक्ष बदली प्रक्रिया 

 

     ➡️टप्पा क्र 1 - समानीकरणातून रिक्त पदे ठरविणे 

     ➡️ टप्पा क्र 2 - विशेष संवर्ग शिक्षक भाग १ बदल्या

     ➡️ टप्पा क्र 3 - विशेष संवर्ग शिक्षक भाग २ बदल्या

     ➡️ टप्पा क्र 4 - बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या

     ➡️ टप्पा क्र 5 - बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या

     ➡️ टप्पा क्र 6 - विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा

7) कार्यमुक्तीचे आदेश. 

 

🌹जिल्हांतर्गत बदल्या खो-खो पद्धतीनेच होणार.... शाळांनिहाय रिक्त जागा कशा घोषित केल्या जातील पहा. 

 

🌹जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती घोषित करतील. सदर कार्यवाही करित असताना प्रथमतः मा. उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र 3278/2010 बाबत दि. 13.09.2012 व दि. 21.10.2012 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी/नक्षलग्रस्त/पेसा क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळानिहाय शक्यतो सम प्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा व सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांच्या जागा रिक्त दाखविण्यात येतील. त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखविण्यात येतील. म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र असणाऱ्या सर्व शिक्षकांच्या जागा रिक्त दाखवल्यामुळे संवर्ग 1, 23 मधील शिक्षक त्यांच्या जागा मागू शकतात. म्हणजेच बदल्यातील खो-खो पद्धत पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. 

 

🌹समानीकरणातून ज्या शाळांमध्ये रिक्त जागा ठेवायच्या आहेत त्या शाळांची व  निव्वळ रिक्त जागा असलेल्या शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून जाहीर करण्यात येईल. 

 

🌹शिक्षकांच्या बदल्या करित असताना समानीकरणांतर्गत रिक्त जागांवर कोणालाही बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही.

 

🔴प्रत्यक्ष टप्प्या निहाय बदल्या कशा होतील

 

टप्प्या-टप्प्यानिहाय बदली प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रथम संवर्ग 1 च्या बदल्या, नंतर संवर्ग 2 च्या बदल्या, नंतर संवर्ग 3 च्या बदल्या, नंतर संवर्ग 4 च्या बदल्या, सर्वात शेवटी विस्थापितांच्या बदल्या केल्या जातील. 

 

➡️टप्पा क्र 1 - समानीकरणातून बदलीस पात्र शिक्षक कसे ठरविले जातील

 

ज्या शाळांमध्ये समानीकरणातून रिक्त ठेवायच्या पदापेक्षा कमी रिक्त पदे असतील आणि त्या शाळेतील शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांची बदली करण्यात येईल. तथापी बदलीपात्र शिक्षक नसतील तर अतिरिक्त शिक्षक निश्चित केले जातील. त्यांचा बदलीपात्र शिक्षकांच्या यादीत समावेश करण्यात येईल. 

 

उदा 1 - समजा एका शाळेत 10 शिक्षक मंजूर आहेत. समानीकरणातून त्या शाळेत 3 जागा रिक्त ठेवायच्या आहेत. सद्यस्थितीत त्या शाळेत एकच पद रिक्त आहे. अशावेळी दोन सेवाजेष्ठ शिक्षकांचा बदलीस पात्र यादीत समावेश करण्यात येईल. (बदलीस पात्र नसले तरीही)

 

उदा 2 - समजा एका शाळेत 10 शिक्षक मंजूर आहेत. समानीकरणातून त्या शाळेत 3 जागा रिक्त ठेवायच्या आहेत. सद्यस्थितीत त्या शाळेत एकही पद रिक्त नाही. अशावेळी तीन सेवाजेष्ठ शिक्षकांचा बदलीस पात्र यादीत समावेश करण्यात येईल. (बदलीस पात्र नसले तरीही) 

 

उदा 3 - समजा एका शाळेत 2 शिक्षक मंजूर आहेत. समानीकरणातून त्या शाळेत एक पद रिक्त ठेवायचे असल्यास कार्यरत दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाचा समावेश बदलीपात्र यादीत केला जाईल. (बदलीस पात्र नसला तरीही) 

 

➡️टप्पा क्र 2 - विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या कशा होतील

 

टप्पा 1 प्रमाणे कार्यवाही झाले नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील शिक्षकांना बदलीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल. संवर्ग 1 साठी त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जाईल. ऑनलाईन फॉर्म भरुन बदली प्रक्रिया पूर्ण केली जाईल. संवर्ग 1 च्या फक्त विनंती बदल्या होतील. बदलीपात्र यादीत नाव असल्यास आणि बदली नको असल्यास स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. बदली सेवाजेष्ठता वरील व्याख्येतील प्राधान्य क्रमानुसार राहील. या संवर्गातील शिक्षकांना रिक्त जागा व बदलीस पात्र सर्व शिक्षकांच्या जागा दाखविण्यात येतील. संवर्ग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यास पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. 

 

➡️टप्पा क्र 3 - विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 यांच्या बदल्या कशा होतील

 

एक युनिट कसे मानावे

 

टप्पा क्र 2 प्रमाणे कार्यवाही झालेनंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यानंतर त्याच्या बदल्या करण्यात येतील. संवर्ग 2 साठी रिक्त जागा, बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा व संवर्ग 1 मधील शिक्षकांच्या रिक्त झालेल्या जागा दाखविण्यात येतील. 

 

जे शिक्षक संवर्ग 2 मध्ये येतात त्यांनी विवरण पत्र क्र 4 मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक राहील.  जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल. 

 

उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार एक एकक (one unit) मानून बदली करण्यात येईल. यापैकी एकाची जरी 10 वर्षे सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र म्हणून ग्राह्य धरले जाईल. 

 

पती-पत्नी एकत्रीकरणासाठी 30 किमी नजीकचे अंतर विचारात घ्यावे. सदर दाखला देणेस कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग सक्षम प्राधिकारी राहतील. तसेच संवर्ग 2 चा लाभ घेते वेळी पती किंवा पत्नी सेवेत असल्याबाबतचे सक्षम अधिकार्‍याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील

 

संवर्ग 2 मधील शिक्षकांचा सेवाजेष्ठ क्रमांक वरील व्याख्येमध्ये दाखविल्याप्रमाणे असेल. 

 

विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत बदलीचा लाभ घेतल्यास पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

 

➡️टप्पा क्र 4 - बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या कशा होतील

 

टप्पा क्र 3 प्रमाणे कार्यवाही झालेनंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी दिला जाईल. तद्नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा तीन वर्षे झालेली आवश्यक असून त्याने बदलीसाठी विवरणपत्र 1 प्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी एकूण रिक्त जागा, संवर्ग 12 च्या रिक्त झालेल्या जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा दाखविण्यात येतील. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर पसंतीक्रम दिला नाही किंवा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाही आणि हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.

 

➡️टप्पा क्र 5 - बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या कशा होतील

 

टप्पा क्र 1,2,34 मध्ये नमूद कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षकांची एक सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर वरील पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जाईल. शिक्षकांचा प्राधान्य क्रम व पसंतीक्रम विचारात घेवून नियुक्ती दिली जाईल. यामध्ये समानीकरणातील जागा सोडून इतर रिक्त जागांवर बदली करण्यात येईल. पसंतीक्रम न दिल्यास उपलब्ध जागेवर नियुक्ती दिली जाईल.

 

➡️टप्पा क्र 6 - विस्थापित शिक्षकांच्या बदल्या कशा होतील

 

टप्पा क्र 5 पूर्ण झालेनंतर सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर करण्यात येईल. टप्पा क्र ५ मधून उरलेल्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जाईल.  त्यानंतर प्राधान्य क्रम व पसंतीक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल. जर समजा शिक्षकांनी प्राधान्य क्रम दिले नाहीत किंवा त्यांच्या प्राधान्य क्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास सेवाजेष्ठतेने उपलब्ध जागेवर बदली करण्यात येईल.

 

🔴बदली प्रक्रियेतील समानीकरण मुद्द्याचे स्पष्टीकरण

 

अवघड / पेसा व सुगम क्षेत्रातील शिक्षकांचा समतोल राहावा. दोन्ही क्षेत्रात समान शिक्षक कार्यरत राहावेत. अशा चांगल्या हेतूने, तसेच सर्व शिक्षकांना समान न्याय देणारा, अवघड क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणारा मुद्दा आहे. पण हा मुद्दा बऱ्याच शिक्षकांना अन्याकारक वाटतो. काय आहे समानीकरण मुद्दा पाहूया. 

 

✳️RTE Act नुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत 10% पेक्षा जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाहीत्यामुळे समानीकरणाचे धोरण नियमानुसार राबविण्यात येईल, याची दक्षता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावयाची आहे. 

 

✳️समानीकरणातून अवघड /पेसा व सुगम क्षेत्रातील शिक्षकांचा समतोल साधला जाईल. 

 

 ✳️ समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची समिती गठित करण्यात येईल. समानीकरणासाठी *कोणत्या जागा निश्चित कराव्यात, याबाबत चा निर्णय सदर समिती घेईल. 

 

✳️समानीकरणातून रिक्त ठेवलेली पदे कोणत्याही संवर्गातील शिक्षकांना उपलब्ध केली जाणार नाहीत.

 

✳️टप्पा क्र. 5 मधील विस्थापित शिक्षकांना सुद्धा समानीकरणातून रिक्त ठेवलेली पदे घेता येणार नाहीत. 

 

✳️प्रतिनियुक्ती देण्यात येणाऱ्या शिक्षकांना सुद्धा समानीकरणातील पदे रिक्त ठेवली जाणार नाहीत. 

 

✳️समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय ती पदे खुली करता येणार नाहीत.

 

✳️शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्याबाबत राज्य स्तरावर एक नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येईल. 

 

✳️तांत्रिक बाबींसाठी एक कार्यक्रम अधिकारी नियुक्त केला जाईल. जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी त्याची असेल. 

 

✳️ 1 मे ते 31 मे पर्यंत बदल्या पूर्ण करण्यात याव्यात. 

 

✳️समानीकरणाच्या जागा निश्चितीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची समिती गठित करण्यात येईल. 

 

✳️अपवादात्मक परिस्थितीत प्रतिनियुक्ती करावयाची असल्यास विभागीय आयुक्त यांच्या परवानगीने करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ऑनलाईन बदल्या झाल्यानंतर करण्यात यावी. 

 

✳️प्रतिनियुक्ती साठी प्रसुती रजा, बालसंगोपन रजा, गंभीर अपघात, इ. बाबींचा विचार घेण्यात येईल. प्रतिनियुक्ती साठी कोणते शिक्षक निश्चित करावयाचे याबाबत समिती गठित करण्यात येईल. 



स्कॉलरशिप 5 वी सराव प्रश्नपत्रिका संच 
छापील प्रश्नपत्रिका संच उपलब्ध 

अधिक माहितीसाठी खालील कोणत्याही एका चित्रावर क्लिक करा.


















 

आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)

WHATS APP GROUP'S =  (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)

मिशन स्कॉलर       10

मिशन स्कॉलर       11

मिशन स्कॉलर       12

 

 

मिशन स्कॉलर       13

मिशन स्कॉलर       14

मिशन स्कॉलर       15

मिशन स्कॉलर       16

मिशन स्कॉलर       17

मिशन स्कॉलर       18

 

 

 

 

मिशन स्कॉलर       19

मिशन स्कॉलर      20

मिशन स्कॉलर       21

मिशन स्कॉलर       22

मिशन स्कॉलर       23

मिशन स्कॉलर      24

 

 


 

मिशन स्कॉलर       25

मिशन स्कॉलर       26

मिशन स्कॉलर       27

मिशन स्कॉलर       28

मिशन स्कॉलर       29

मिशन स्कॉलर       30






हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :


MISSION ENGLISH   (इंग्रजी तयारी)

CLICK HERE


स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित  संपूर्ण तयारी

CLICK HERE


जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)

येथे क्लिक करा.


मिशन स्कॉलरशिप 5 वी 

येथे क्लिक करा.


गणित : सूत्रे, नियम, व्याख्या

येथे क्लिक करा.


प्रज्ञाशोध परीक्षा सराव

येथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.