राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याने मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय व राज्य पातळीवर “निपुण भारत अभियान" सुरु करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व प्रारंभिक संख्याज्ञान (FLN) विकसित व्हावे याकरिता उपक्रम राबविण्यात येत आहेत.
"निपुण भारत अभियान" अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे. या वर्षीच्या गणितोत्सव" ची प्रमुख संकल्पना (Theme) "पायाभूत संख्याज्ञान" (FLN-foundational Numeracy) ही निश्चित करण्यात येत आहे.
शासन निर्णय वाचा :
शासन निर्णय डाऊनलोड करा.: