शालेय पोषण आहार योजनेतंर्गत
प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत आजचा शासन निर्णय
राज्यामध्ये शालेय
पोषण आहार (Mid Day Meal) ही योजना इ.१ ली ते
इ.८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत इ.१ ली ते इ.५ वी
मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच,
इ. ६ वी ते इ.८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील
विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेंतर्गत
केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च
प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
केंद्र शासनाने दि.२४
जून, २०१९ च्या आदेशान्वये सन २०१९-२०
या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात ३.०९ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले
होते. यानुसार संदर्भाधिन दि.१९ जुलै, २०१९ च्या शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासाठीचे (Cooking
Cost) प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक
वर्गासाठी रु.४.४८ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रु.६.७१ याप्रमाणे निश्चित करण्यात
आलेली होती. केंद्र शासनाने संदर्भाधिन दि.१४ एप्रिल, २०२० च्या आदेशान्वये सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात
१०.९९ टक्के दरवाढ मंजूर केली आहे. तसेच, सदर दर दि.०१ एप्रिल, २०२० पासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, राज्य शासनाच्या वित्त विभागाने सध्यस्थितीत सदर दरवाढ सन २०२१-२२ या आर्थिक वर्षापासून
लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार संदर्भाधिन दि.०२/०२/२०११ च्या शासन निर्णयान्वये
विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सदर दरवाढ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन
होती.
शासन निर्णय :
१) शालेय पोषण आहार
योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्याना खालीलप्रमाणे आहाराचा
पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधारित दरास मान्यता देण्यात येत आहे.
२) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदूळाबरोबरच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. सदर धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक लाभार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३) प्रस्तुत योजनेमध्ये
शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्था / बचत गट यांचेमार्फत शिजविलेल्या तयार
आहाराचा पुरवठा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह
प्रणालीचा वापर करुन तयार आहाराचा पुरवठा करण्यात येत असल्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांना
अनुज्ञेय खर्च मर्यादा खालीलप्रमाणे राहील. सदर आहार खर्चाच्या मर्यादेत शासनाने निश्चित
केलेल्या धोरणाप्रमाणे अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेणा अनुदान देय राहील.
४) सदरचे सुधारित
दर राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या निर्देशानुसार दि.०१ एप्रिल, २०२१ पासून लागू होतील.
शासन निर्णय परिपत्रक वाचा : 👇👇
शासन निर्णय परिपत्रक DOWNLOAD : 👇👇