पहिली ते चौथी (ग्रामीण) व पहिली ते आठवी (शहरी) शाळा
सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील सर्व शाळा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात अजूनही प्राथमिक शाळा (Primary School) सुरू करण्यात
आलेल्या नाही. राज्यात 5 वी ते 12 वीच्या शाळा सुरू आहेत. आता मात्र, पहिली ते बारावीच्या शाळा
सुरु होणार आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश यांनी शाळा सुरू करण्याबाबत मंगळवारी माहिती दिली
होती. टास्कफोर्सनं शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली अल्याचं
आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर प्रशासन आणि टास्क फोर्सने मिळून हा
निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
शाळांसाठीचे नवे १५ सरकारी नियम
१. शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पहिल्या दिवशी
विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्वागत करावे.
२. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा भेटींचे नियोजन करुन त्याची एक प्रत
प्राथमिक/माध्यमिक शिक्षण संचालनालयाला द्यावी.
३. शाळा भेटीचे फोटो, व्हिडीओ आपल्या अथवा आपल्या सहकाऱ्याच्या
फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटर यापैकी एका किंवा सर्व समाजमाध्यमावर पोस्ट
कराव्यात. पोस्टसोबत आपले नाव, पद, जिल्हा, तालुका, भेट घेतलेल्या शाळेचे नाव, यु डायस क्रमांक, भेटीचे दिनांक व वेळ टेक्स्ट तपशील देखील अपलोड
करावा.
४. फेसबुक / इन्स्टाग्राम/ ट्विटर या समाज माध्यमावर
पोस्ट करताना ती Public असावी. तसेच फेसबुकवर पोस्ट करताना Story मध्ये शेअर न करता Wall वर शेअर करण्यात यावी.
५. भेटीच्या फोटोसोबत आपण आपल्या भेटीचा / शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट
करताना तो जास्तीत जास्त २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा. फोटो व व्हिडीओ सुस्पष्ट
असेल याची काळजी घ्यावी.
६. समाजमाध्यमावर पोस्ट करताना #MVMJ2021, #शिक्षणोत्सव या हॅशटॅगचा (#HASHTAG)
वापर करावा.
७. पोस्ट करताना फेसबुकवर @SCERT,Maharashtra
, @thxteacher, ट्विटरवर @scertmaha , @thxteacher आणि इंस्टाग्रामवर @scertmaha , @thankuteacher यांना टॅग करावं. पोस्ट Public असावी.
८. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. त्याचे
देखील फोटो सूचनांप्रमाणे अपलोड करण्यावेत.
९. आपण पोस्ट केलेली समाजमाध्यमावरील पोस्ट कॉपी करून घ्यावी आणि https://scertmaha.ac.in/mvmj या प्रणालीवर जाऊन आवश्यक तपशील भरून सबमिट
करण्यात यावी.
१०. शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या भेटीची नोंद राज्यस्र्तरीय प्रणालीवर करण्यात
येईल.
११. शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक
देखील आपल्या शाळेतील शिक्षणोत्सवाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करू
शकतात.
१२. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शालेय गणवेश वाटप करावे.
१३. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं लसीकरण करुन घ्यावं.
लसीकरण झालं नाही या कारणास्तव अनुपस्थित राहता येणार नाही. विद्यार्थ्यांचं
नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची १०० टक्के हजेरी असावी. लसीकरण झालंय त्यांना
कोरोना चाचणीचं बंधन नसेल,इतरांना ही चाचणी करावी लागेल.
१४. मुख्यमंत्र्यांचं ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ सर्व शिक्षकांनी
पाहावा. विद्यार्थ्यांनाही हा कार्यक्रम दाखवावा.
१५. ग्रामीण भागात १ ली ते चौथी आणि शहरी भागात १ ली ते ८ वीच्या
विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करावं.
स्कॉलरशिप परीक्षा 5 वी घटकनिहाय तयारी