पृथ्वीवरील सर्व सागरांमध्ये एकंदर किती पाणी
आहे?
आज आपण जे पाणी वापरतो ते बहुधा सागरांच्या निर्मितीबरोबरच तयार झाले असावे. सूर्याच्या
प्रकाशाने सागराच्या पाण्याची वाफ होते. वाफ हलकी होऊन वर जाते, तिचे ढगांत रूपांतर होते, ढगांमधून पाऊस कोसळतो आणि सरतेशेवटी तेच पाणी नदी-नाल्यांमार्फत
पुन्हा समुद्राला जाऊन मिळते. असे हे जलचक्र कोट्यवधी वर्षे सुरू आहे.
पृथ्वीवर निरंतर जलचक्र कार्यरत असले तरी सागरांमधील फारच थोड्या पाण्याचे वाफेत
रूपांतर होत असते. पृथ्वीवर असलेल्या एकंदर पाण्यापैकी
९६.५ टक्के पाणी सागरांमध्येच आहे. जलचक्रामध्ये बाष्पाच्या स्वरूपात
जे काही पाणी आकाशात जाते, त्यापैकी ९० टक्के पाणी
सागरांमार्फतच जाते. इतर पाणी तलाव, छोटे-मोठे समुद्र, नद्या यांच्यामार्फत हवेत
जाते.
समुद्राच्या पाण्याचा विशेष असा की ते खारट आहे, कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे क्षार विरघळलेले असतात. साध्या पाण्यात प्रति दशलक्ष रेणूंमागे क्षारांचे १००० रेणू असतील
तर ते खारट समजले जाते. महासागरांच्या पाण्यात दशलक्ष रेणूंमागे क्षारांचे ३५००० रेणू
असतात.
सागरांमधील पाण्याचा साठा बदलतो, पण अत्यंत मंद गतीने. हिवाळ्यामध्ये ध्रुवांवरील बर्फाचे थर वाढतात, ते अधिक क्षेत्रफळ व्यापतात. तसेच हिमनद्यांमध्येही अधिक बर्फ
साचतो. त्यामुळे पृथ्वीवरील एकंदर पाण्याच्या साठ्यापैकी फार मोठ्या भागाचे बर्फात
रूपांतर होते. अर्थात त्या काळात सागरांमधील पाण्याचा संचय थोडा कमी होतो. उदाहरणार्थ, मागील हिमयुगात बर्फाने पृथ्वीवरील एक तृतीयांश जमीन व्यापली
होती. त्या वेळी सागरांची पातळी आज आहे त्यापेक्षा १२२ मीटरनी (४०० फुटांनी) कमी होती.
एक लक्ष २५ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर तापमानवृद्धी झाली होती, त्या वेळी सागरांच्या पाण्याची पातळी आज आहे त्यापेक्षा ५.५
मीटरनी (१८ फुटांनी) अधिक होती. तीस लक्ष वर्षापूर्वी सागरांच्या पाण्याची पातळी आज
आहे त्यापेक्षा ५० मीटरनी (१६५ फुटांनी) जास्त असावी. पृथ्वीवरील सर्व सागरांमध्ये
असलेल्या पाण्याच्या संचयाचा अंदाज असा आहे.
पृथ्वीवरील पाणी -
खारे पाणी (महासागर) : 97%
गोडे पाणी : 3%
=================
गोडे पाणी
भूमिगत पाणी : 30.1 %
बर्फाचे थर आणि हिमनद्या : 68.7%
=========
भूपृष्ठावरील गोड पाणी :
नद्या : 2 %
तलाव / इतर : 87 %
दलदल : 11%
=========
-
|
पाण्याचे घनफळ
(घन किलोमीटर) |
प्रमाणाची टक्केवारी |
महासागर, उपसागर, समुद्र वगैरे |
१३३८०००००० |
९६.५ टक्के |
पृथ्वीवरील एकंदर पाणी |
१३८६०००००० |
- |