rimc exam Rashtriy Indian Military College Dehradun Admission राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, देहराडून प्रवेश प्रक्रिया (8 वी) प्रसिद्धीपत्रक (Rashtriy Indian Military College Dehradun Admission)


प्रसिद्धीपत्रक

परीक्षा प्राधान्य

 

प्रति,

मा. महासंचालक,

• माहिती जनसंपर्क महासंचालनालय,मंत्रालय, तळमजला, मुंबई ४०० ०३२.

 

विषय:- राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१ विनामूल्य प्रसिध्दीदेणेबाबत.

संदर्भ: मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, यांचे क्र. EE / ०१/ DEC२१/NT दि. २८ जुलै २०२१ रोजीचे पत्र.

 

महोदय,

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणान्या "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१ च्या संदर्भातील (इंग्रजी व द्यावयाच्या निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.

कृपया सोबतचे प्रसिध्दीपत्रकास राज्यातील सर्व वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ पर्यंत विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी अशी विनंती आहे.

आपला विश्वासू,

(तुकाराम सुपे) आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे

दि. ०६/०८/२०२२

############

 

प्रसिध्दीपत्रक

 

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२१

 

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी "राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता ८ वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक १८ डिसेंबर २०2१ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे याची नोंद घ्यावी.

 

• प्रवेश वयाची अट:

१) या परीक्षेसाठी उमेदवाराचे (विद्यार्थ्याचे) वयोमर्यादा (वय) दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी ११ 1/2 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थ्याचा (उमेदवाराचा) जन्म दिनांक ०२ जुलै २००९ च्या आधि व दिनांक आणि ०१ जानेवारी २०११ च्या नंतरचा नसावा.

 

                                                                   • शैक्षणिक पात्रता :

 

विद्यार्थी (उमेदवार दिनांक ०१ जुलै २०२2 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण झालेला असावा.

परीक्षा शुल्क :

आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता:

१) परीक्षेसाठी मा. कमांडेंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचा आहे. जनरल संवर्गातील विद्याथी उमेदवारा करीता रु. ६००/- चा डी.डी. व अनुसूचित जाती जमाती करीता रु. ५५५/- चा डी.डी. कमांडंट "राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल भवन, देहराडून, बैंक कोड नं. (०१५७६) या नावाने काढवा. सदर डी. डी. मा. कमांडंट "राष्ट्रीय Activate Windows इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, २४८ ००३ या पत्त्यावरती पाठविणे आवश्यक आहे .अनुसूचित जाती जमाती करीता डी. डी सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत छायांकित प्रत पाठविणे बंधनकारक आहे.   डी.डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तीक स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.

 

२) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या http://www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्म) ची मागणी आपण करू शकता.

आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे - ४११००१. या पत्त्यावरती दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जावून जमा करावीत. अंतिम मुदतीनंतर उशीराने आलेले आवेदनपत्र (फॉर्म) कोणत्याही परिस्थिती मध्ये स्वीकारले जाणार नाहीत.

 

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय यांचे पत्र क्र. A/36105 GS MT-6 D (GS-II) दिनांक ०३ सप्टेंबर २०१४ नुसार केंद्र सरकारी नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले लेखी आणि मौखिक परीक्षा ज्या राज्यामध्ये संबंधीत कर्मचाऱ्यांची पोस्टींग आहे त्या ठिकाणी देवू शकतात. त्या मुलांची निवड त्यांच्या मूळ अधिवास राज्यानुसार होईल आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांच्या मूळ अधिवासाच्या स्थितीनुसार असेल उमेदवार विद्यार्थी) ज्या राज्यातून परीक्षा देऊ इच्छितो त्याच राज्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

 

आवेदनपत्र कसे भरावे:

 

आवेदनपत्र (फॉर्म) २ (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे.

१. जन्म दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)

२. अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत ( झेरॉक्स कॉपी).

३. अधिवास (Domicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)

४. शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मुळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे. १५. आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्यांचे (उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.

६. आवेदनपत्र भरताना ४ (चार) पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे. त्यापैकी २ (दोन) फोटो आवेदनपत्रावर (फॉर्मवर) चिकटवून त्याखाली उमेदवाराने विद्यार्थ्याने) स्वाक्षरी करावी व २ (दोन) फोटोंच्या माठीमागे नाव व स्वाक्षरी करून फॉर्म सोबत जोडावे.

उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकान्यांमार्फत साक्षांकित

(Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.

प्रसिद्धीपत्रक वाचा :

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.