तिसरी वार्षिक
योजना (1968-69):
अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या.
व्यवहारतोलाची परिस्थिती सुधारली.
चौथी योजना सुरू करण्यास योग्य परिस्थिती निर्माण
झाली.
हरित क्रांतिचे मूल जनक – नॉरमल बोरलाग.
हरित क्रांतिचे भारतीय जनक – एम. एस. स्वामिनाथन, सी. सुब्रमन्यम.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
तिसरी पंचवार्षीक योजना
कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.
मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.
प्रतिमान : महालनोबिस.
योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च –
7500 कोटी रु, वास्तविक खर्च –
8577 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.
प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
मानव विकास निर्देशांक बद्दल माहिती
जनतेची सुस्थिती (well-being) हे विकासाचे ध्येय असते. केवळ पैसा लोकांची आर्थिक, सामाजिक,
सांस्कृतिक अशा अंगांनी सुस्थिती निर्माण करू शकत नाही. त्यामुळे संयुक्त
राष्ट्राने (UN) ‘मानव विकास’ या संकल्पनेचा पुरस्कार केला
आहे.
संयुक्त राष्ट्राने मानवी विकासाची व्याख्या
‘लोकांच्या निवडींच्या विस्ताराची प्रक्रिया’ (Process of enlarging
people’s choices) अशी केली आहे.
मानवी विकासाच्या सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये
दीर्घ व आरोग्यावन जीवन, शिक्षण व उत्तम राहिणीमानाचा
दर्जा, यांचा समावेश होतो. इतर निवडींमध्ये (choices)
राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्कांची हमी आणि
स्वावलंबन व आत्मप्रतिष्ठेचे विविध घटक, यांचा समावेश होतो.
या अत्यावश्यक निवडी (essential choices) आहत, कारण त्यांच्या अभावी इतर अनेक संधीपासून वंचित रहावे लागू शकते, यावरून, मानवी विकास ही लोकांच्या निवडींच्या
विस्ताराच्या प्रक्रियेबरोबरच सुस्थिती उंचवण्याचीही प्रक्रिया आहे.
म्हणून, विकास
लोकांभोवती रचला पाहिजे, लोक विकासाच्या भोवती नाही. तसेच
विकास हा सहभागायुक्त (participatory) असावा, आणि त्यासाठी लोकांना आपल्या क्षमातांमध्ये (आरोग्य, शिक्षण व प्रशिक्षणविषयक) सुधारणा करण्यासाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध
असाव्या. तसेच लोकांना आपल्या क्षमता वापरण्याच्याही संधी उपलब्ध असाव्या, त्यासाठी सामुदायिक निर्णयांमध्ये (community decisions) पूर्ण सहभाग घेता यावा आणि तसेच मानवी, आर्थिक आणि
राजकीय स्वातंत्र्याचा लाभ प्राप्त व्हावा.
आर्थिक वृद्धी व मानवी विकास या संकल्पनांमध्ये
मूलभूत फरक असा आहे की, आर्थिक वृद्धिमध्ये केवळ
राष्ट्रीय उत्पन्न वाढीवर भर दिला जातो, मात्र मानवी विकासात
मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा-आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय समावेश केला जातो.
अर्थात, मानवी विकास
घडून येण्यासाठी आर्थिक वृद्धी गरजेची असतेच, मात्र वेगळ्या
दृष्टीकोनातून त्यामागील तत्व असे आहे की, मानवी निवडींच्या
विस्तारासाठी राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा उत्पन्नाचा वापर (use of income and
not income itself) अधिक निर्णायक ठरत असतो. राष्ट्राची खरी संपत्ती
ही राष्ट्रातील लोक असल्याने मानवी जीवनाची समृद्धि हेच विकासाचे ध्येय असले
पाहिजे.
🔸🔸 विकासाचे
आर्थिक निर्देशक (Economic indicators)---
विकासाचे अंतिम उद्दिष्ट्य मानवी प्रगती आहे आणि
हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आर्थिक वृद्धी हे एक महत्वाचे माध्यम आहे.
त्यामुळे एखाधा देशाला झालेला किंवा होत असलेला आर्थिक विकास मोजण्यासाठी ज्या
घटकांचा वापर केला जातो, त्यांना ‘विकासाचे आर्थिक
निर्देशक’ असे म्हणतात. त्यामध्ये पुढील निर्देशकांचा/सूचकांचा समावेश होतो.
🔸राष्ट्रीय उत्पाद व
उत्पन्न :---
देशातील आर्थिक क्रियांचा स्तर मोजण्यासाठी
राष्ट्रीय उत्पाद व राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. राष्ट्रीय उत्पाद
बाजारभावला मोजले जाते, तर राष्ट्रीय उत्पन्न घटक
किमातींना मोजले जाते.
केवळ वस्तू-सेवांच्या किंमतींमध्ये वाढ
झाल्यानेही राष्ट्रीय उत्पाद वाढते. मात्र ही खरी वाढ नसते, म्हणून राष्ट्रीय उत्पाद चालू तसेच स्थिर किंमतींना मोजले जाते.
🔸दर डोई उत्पन्न :----
दर डोई उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न भगिले
लोकसंख्या होय. म्हणजेच, एका व्यक्तिमागील राष्ट्रीय
उत्पान्न होय. दरडोई उत्पन्न हा अधिक चांगला निर्देशक मनाला जातो, मात्र तो एक साधा सरासरी असतो, त्यातून उत्पन्नाचे
खरे वितरण समजून येत नाही.
देशाचे दरडोई उत्पन्न जास्त असले तरी मात्र
त्याचे व्यक्तिनिहाय वितरण अत्यंत असमान असू शकते.
🔸उत्पन्न व संपत्तीची
समानता/ विषमता :----
कोणत्याही देशात उत्पन्न व संपत्तीची पूर्ण
समानता असणे शक्य नाही. यावरून उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण
मोजण्यासाठी लॉरेंझ वक्ररेषा व गिनी गुणांकाचा वापर केला जातो. लॉरेंझ
वक्ररेषेवरुन काढलेला गिनी गुणांक जेवढा कमी तेवढे उत्पन्न/संपत्तीचे वितरण अधिक
समान असते, तर याउलट गिनी गुणांक जेवढा जास्त तेवढे हे
वितरण अधिक असमान असते.
🔸दारिद्रयाचा स्तर :--
दारिद्रयाचा उच्च स्तर आर्थिक विकासाची कमतरता
दर्शवितो. दरिद्रयाचा स्तर दारिद्रय रेषेने दर्शविला जातो. दारिद्रयाच्या
स्तरावरून जीवनाच्या गुणवत्तेचा स्तर, उपासमार,
कुपोषण, निरक्षरता व पर्यायाने मानवी विकास
स्तराचा अंदाज येतो.
आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास
आर्थिक वृद्धी (Economic Growth) :
आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून
देशातील वस्तु व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होणे
होय. म्हणजेच, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जणाच्या प्रक्रियेला
आर्थिक वृद्धी म्हटले जाते.
अर्थात राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले म्हणून
त्यास आर्थिक वृद्धी म्हणणे अयोग्य ठरते.
आर्थिक वृद्धीचे मोजमाप साधारणत: जी.डी.पी.च्या
संदर्भात केले जाते.
अशा रीतीने, देशाचा
जी.डी.पी. वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असे म्हणतात, तर एका वर्षाचा जी.डी.पी. मागील वर्षाच्या जी.डी.पी. च्या तुलनेत जेवढ्या
टक्क्यांनी वाढलेल्या असतो त्यास आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात.
वृद्धी दर धनात्मक किंवा ऋणात्मक असे शकतो.
वस्तू व सेवांचे भौतिक उत्पादन वाढणे, हे खरे आर्थिक वृद्धीचे धोतक आहे.
वास्तु व सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने
वाढलेले जी.डी.पी. आर्थिक वृद्धी दर्शवित नाही. त्यामुळे खरी आर्थिक वृद्धी नॉमिनल
जी.डी.पी.तील वाढीच्या तुलनेत वास्तव जी.डी.पी. (real GDP) वाढीने चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते.)
#########################
आर्थिक विकास (Economic Development) :
‘आर्थिक विकास’ ही ‘आर्थिक वृद्धी’ पेक्षा एक
व्यापक संकल्पना आहे. ती एक गुणात्मक संकल्पना आहे.
‘विकास’ या संकल्पनेत केवळ आर्थिक वृद्धीच नव्हे,
तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश
होतो. (पुढे केवळ आर्थिक विकासाच्या संकल्पनेची चर्चा केलेली आहे.)
‘आर्थिक विकासा’ मध्ये आर्थिक वृद्धीबरोबर
राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल,
यांचा समावेश होतो.
दुसर्या भाषेत, आर्थिक
वृद्धी होत असतांना दर डोई वास्तव उत्पन्न, दारिद्रय,
बेरोजगारी, देशातील उपन्नाचे वितरण
इत्यादींमध्ये काय बदल होत आहे, यातून आर्थिक विकास सुचीत
होत असेल.
म्हणजेच, आर्थिक
वृढीमुळे निर्माण होणारे फायदे मुठभर भांडवलदारांपूरती मर्यादित न राहता, त्यामुळे सर्वासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील, त्यांच्या हातात पर्याप्त क्रमशक्ती निर्माण होत असेल, दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा
उंचावत असेल व देशातील आर्थिक व सांपक्तिक विषमता कमी होत असेल, तरच आर्थिक विकास होत आहे, असे म्हटले जाईल.
अशा रीतीने, आर्थिक
वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व गटांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया
म्हणजेच आर्थिक विकास होय.
थोडक्यात, आर्थिक विकास
म्हणजे ‘आर्थिक वृद्धी+बदल’ असे म्हणता येईल.
येथे ‘बदल’ ही संकल्पना अर्थव्यवस्थेतील गुणात्मक
बदल दर्शविते. त्यामध्ये दारिद्रय कमी होणे, रोजगार
निर्मिती, विषमता कमी होणे, राहाणीमानाचा
दर्जा उंचावणे, कार्यक्षमता वाढणे, तंत्रज्ञान
विकास, औधोगिक व सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास, व्यक्तींच्या दृष्टीकोनांमध्ये सकारात्मक बदल, यांसारख्या
सकारात्मक बदलांचा समावेश होतो.
भारतीय वित्त व्यवस्थेची रचना भाग – 3 वाचा.