जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर
अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा आज जन्मदिन
(१२ जुलै १८६४ - ५ जानेवारी १९४३)
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले
कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर
यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही
दिले.गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारेखुली झाली
होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्याकार्व्हर यांना
त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षणघेण्यास प्रोत्साहन दिले.
जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयकक्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले.
चित्रकला वा इतर कलेत प्राविण्य असूनही त्यांनी
पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या
जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले.
जॉर्जनी प्रायोगिक शेतात, मातीत
सुधारणा केल्या. अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी, मॉरीस
जेसप या देणगीदाराने दिलेल्या ‘जेसप वॅगन’ या बैलगाडीसारख्या वाहनातून जॉर्ज
घरोघरी जात.
शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ.
वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही
पदाची, पैशाचा
मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला
घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.
दुसऱ्या महायुद्ध काळात
जॉर्ज यांनी अमेरिकन वस्त्रोद्योगासाठी सुमारे पाचशे रंजके (रंग) बनवले. परिणामी
यूरोपमधून रंग आयातीचे परकीय चलन वाचू लागले.सौम्य व्यक्तिमत्वाच्या, मितभाषी, निगर्वी, जॉर्ज
टीकाकारांकडे लक्ष न देता सतत संशोधन करीत राहिले. त्यांनी टीकाकारांना कृतीनेच
उत्तर दिले.जॉर्जनी स्वतःच्या आयुष्यातील सारी शिल्लक टस्कगीतील कार्व्हर रिसर्च
फाउंडेशनला कृषी संशोधनासाठी दान केली.
मराठीत वीणा गवाणकर यांनी
कार्व्हर यांच्या आयुष्यावर आधारित 'एक होता कार्व्हर' हे
राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित पुस्तक लिहिले आहे.
========================
प्रज्ञाशोध परीक्षा (TALENT SEARCH EXAM)
स्कॉलरशिप परीक्षा / नवोदय परीक्षा TESTS सोडवण्यासाठी खालील इयत्तांच्या नावांवर क्लिक करा.
ती PDF डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा
----------------------
मो.रा.वाळिंबे व्याकरण पुस्तिका नोट्स