# (एकच संयुक्त प्रश्नपत्रिका : 100 गुण)
#(वेळ : 2 तास)
# मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)
• विभाग
एक•
# मानसिक
क्षमता चाचणी (40 प्रश्न: 50 गुण)
नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयात
एकूण दहा भाग असतात. दहा भागांत प्रत्येकी चार-चार प्रश्न असून एकूण
40 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात. प्रत्येक
भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन
करणे हा या चाचणीचा उद्देश आहे.
•विभाग दोन•
#अंकगणित
: (20 प्रश्न 25 गुण)
या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उददेश उमेदवारांच्या
अंकगणितातील मूलभूतक्षमता तपासणे हा आहे.
टीप : अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन
यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो.
•विभाग तीन•
#भाषा
: (20 प्रश्न 25 गुण)
या प्रश्नपत्रिकेतील 'भाषा' या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या
वाचन-आकलनाचे मापन करणे आहे. चाचणीमध्ये चार परिच्छेद असतील.
प्रत्येक परिच्छेदाखाली पाच-पाच प्रश्न दिलेले असतील. उमेदवारांनी प्रत्येक
परिच्छेद काळजीपूर्वक वाचून, त्याच्याखालील प्रश्नांची उत्तरे दयायची
आहेत.
=============
•2. सूचना आणि उदाहरणांसंबंधी•
(अ) उमेदवारांनी प्रश्न सोडवण्यास सुरुवात करण्यापूर्वी, चाचणी पुस्तिकेच्या
प्रथम पृष्ठावर दिलेल्या सूचना, तसेच प्रत्येक चाचणीच्या विभागाच्या
सुरुवातीला दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
(ब) प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी साधारणपणे दीड मिनिट लागेल, असे गृहीत
धरलेले असते. तेव्हा उमेदवारांनी एकाच प्रश्नासाठी फार वेळ देऊ नये. जर
एखादा प्रश्न कठीण वाटत असेल, तर तो सोडवण्यासाठी वेळ वाया न
घालवता, त्यापुढचे प्रश्न सोडवावेत. सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर न सुटलेले
प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे वेळ वाचेल.
(क) एकूण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सलग दोन तास इतका वेळ दिला
जाईल.
(ड) प्रवेशपात्र ठरण्यासाठी तिन्ही चाचण्यांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे
आवश्यक असल्याने, एकाच चाचणीवर फार वेळ खर्च न करता, एकंदर
वेळेची विभागणी स्वतःच्या मर्जीनुसार करण्याची
मुभा उमेदवाराला आहे.
(ई) (1) योग्य प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय उमेदवाराला परीक्षागृहात प्रवेश
मिळणार नाही.
(2) चाचणी परीक्षा सुरू होऊन तीस मिनिटे झाल्यानंतर कोणत्याही
उमेदवाराला प्रवेश मिळणार नाही.
(3) चाचणी परीक्षा सुरू होऊन तीस मिनिटे होईपर्यंत कोणत्याही
उमेदवाराला परीक्षागृह सोडता येणार नाही.