प्रसिद्ध वैज्ञानिक आणि उद्योजक निकोला टेस्ला यांची माहिती (Information of famous scientist and entrepreneur Nikola Tesla)




महान वैज्ञानिक आणि उद्योजक निकोला टेस्लांचा

जन्मदिवस. 


(ज्यांचे नाव ईलॉन मस्क यांची जगप्रसिद्ध कंपनी 

'टेस्ला मोटर्स' याला देण्यात आला आहे.)

===============

 

 Ø झोपेत वेळ वाया जाऊ नये म्हणून ते फक्त ४ तास झोपायचे.

वीज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं तत्त्व यासंबंधी अतिशय महत्त्वाचं

 संशोधन करणाऱ्यांपैकी एक म्हणून टेस्ला यांचं नाव घेतलं जातं.

विद्युत जनित्र, रेडिओ लहरी, FM रेडिओ , स्पार्क प्लग, फ्लुरोसेंट

 प्रकाश, क्ष-किरण, रोबोटिक्स, टेलीऑटोमेशन, रिमोट कंट्रोल,

रेडिओ-नियंत्रित जहाज, टेस्ला कॉइल, इत्यादीसंबंधीच्या तंत्रज्ञानांचा

 पाया त्यानी रचला.

Ø आज आपण विद्युत ऊर्जा वापरून ज्या सोयीसुविधा भोगत आहोत

 त्यासाठी आपल्याला टेस्ला यांचे ऋणी रहावे लागेल.

Ø कुशाग्र बुद्धीच्या या वैज्ञानिकाने अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानांचा

 शोध लावला. 

Ø त्यांच्या नावे सुमारे ७०० पेटंट्स होती.पण जगाने त्याला एक

 वैज्ञानिक वा अभियंता म्हणून न ओळखता एक तर्‍हेवाईक, विक्षिप्त,

वेड्या वैज्ञानिकाच्या स्वरूपातच ओळखले. 

= = = = = = = = = = = = = 

 

 ओळख

Øमहान वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता

 निकोला टेस्ला यांचा जन्म सध्याच्या क्रोएशियामध्ये 10 जुलै

1856 रोजी झाला. 

Øआज जगभरात वापरली जाणारी प्रमुख विद्युत

 प्रणाली अल्टरनेटिंग करंट (AC) च्या डिझाईनसाठी ते ओळखले

 जातात. 

Øवीज आणि इलेक्ट्रोमॅग्रेटिझमचं तत्त्व यासंबंधी अतिशय

 महत्त्वाचं संशोधन करणाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. kkk


 लहानपणापासूनच हुशार

Øशाळेत असताना टेस्ला गणिताचे कठीण प्रश्न मनातल्या मनात

 सोडविण्यास सक्षम होते. 

Øवयाच्या नवव्या वर्षी त्यांनी उडणाऱ्या माश्यांच्या हालचालींमधून मिळणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर चालणारी विजेची मोटार बनवली. 

Øत्यांना आठ भाषा येत होत्या.

 

नोकरीची सुरूवात

 Ø1881 मध्ये टेलीग्राफ कंपनीत नोकरी मिळवून त्यांनी संप्रेषण

 उपकरणांमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आणि टेलिफोन

 अॅम्पलीफायरची नव्याने रचना केली. 

Ø1882 मध्ये वॉमस एडिसन यांच्या कंपनीच्या फ्रान्स युनिटमध्ये ते रुजू झाले. 

Øथॉमस एडिसन यांच्या शोधात टेस्ला यांचा मोठा वाटा होता. परंतु दोघात वाद निर्माण झाल्यामुळे त्यांनी एडिसनची कंपनी सोडली.

 

संशोधन

Øआज आपण विद्युत ऊर्जा वापरून ज्या सोयीसुविधा भोगत आहोत

 त्याचं श्रेय टेस्ला यांनाच जातं. 

Øविद्युत जनित्र, रेडिओ लहरी, FM रेडिओ, क्ष-किरण, रोबोटिक्स,

टेलीऑटोमेशन, रिमोट कंट्रोल,रेडिओ-नियंत्रित जहाज, टेस्ला

 कॉइल इत्यादीसंबंधीच्या तंत्रज्ञानांचा पाया त्यांनी रचला.

 

पुरस्कार

 

1. त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने टाइम मासिकाने

 मुखपृष्ठावर त्यांना स्थान दिले. यावेळी त्यांना 70

महानवैज्ञानिकांकडून कौतुकाची पत्रे मिळाली ज्यात एक

 आइनस्टाईन देखील होते. 2. 2 कि.मी. व्यासाच्या खड्याचे नाव

 टेस्ला आहे.

2. चंद्रावरील 2 किमी व्यासाच्या खड्याचे नाव टेस्ला आहे

3. मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यान आढळलेल्या एका लघुग्रहाला 

2244 टेस्ला हे नाव देण्यात आले आहे.

4. विद्युत कार बनवणाऱ्या अमेरिकन कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स

 आहे.

 

 निकोला टेस्ला आणि एडिसन

 

Øटेस्ला आणि एडिसन यांच्यातील वैमनस्यता संपूर्ण विज्ञान जगात

 चर्चेचा विषय ठरली होती.

 Øएडिसनला सोडल्यानंतर टेस्लांनी उद्योगपती जॉर्ज वेस्टिंग

 यांच्यासमवेत AC प्रणाली जगासमोर ठेवली, ज्याचा एडिसनने

 विरोध केला. 

Øएडिसन आणि टेस्ला यांच्यात बरेच संघर्ष झाले असले

 तरीही, एडिसन यांनी शेवटच्या वर्षांत टेस्लांप्रती असलेल्या त्यांच्या

 चुकीच्या व्यवहाराबद्दल जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. 

 

मृत्यू

 

Øटेस्लांच्या नावे सुमारे 700 पेटंट्स असूनसुद्धा ते शेवटपर्यंत

 कफल्लकच राहिले. काही दिवस खड्डे खणून त्यांना पोट भरावे

 लागले. 

Ø7 जानेवारी 1943 रोजी 86 व्या वर्षी निकोला टेस्ला यांचे

 निधन झाले. काही प्रयोग अयशस्वी ठरल्याने ते नैराश्याला बळी

 पडले. 

Øअसे मानले जाते की त्यांना (Obsessive Compulsive

 Disorder / OCD) हा विकार होता, जो त्यांच्यासारख्या एकट्या

 राहणाऱ्या वैज्ञानिकांसाठी सामान्य आहे.

 

 आपल्या कामाप्रतीची निष्ठा आणि वेडच तुम्हाला

 जे हवं आहे ते सर्वकाही मिळवून देऊ शकतं.

 

- निकोला टेस्ला


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.