मिशन स्कॉलरशिप / मिशन नवोदय{मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या
[त्रिकोण]
संकलन – महादेव बाबासाहेब पाटील
----------------------------------------------------------------------------------------------------------------
{1} त्रिकोण = तीन बाजू असलेल्या बंद आकृतीला त्रिकोण म्हणतात.
त्रिकोणाला 3 शिरोबिंदू , 3 बाजू, 3 कोन
असतात.
{2} त्रिकोणाचे प्रकार (कोनांवरून) :
(1) लघुकोन त्रिकोण
= ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात तेंव्हा त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात.
(2) काटकोन त्रिकोण = एक कोन काटकोन असतो.
(3) विशालकोन त्रिकोण = या त्रिकोणाचा एक कोन 90
अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा लहान असतो.
{3} त्रिकोणाचे प्रकार (बाजुंवरून)
(1) समभूज त्रिकोण = तिन्ही बाजू समान व तिन्ही कोन समान
म्हणजेच 60 अंशाचे असतात.
(2) समद्विभूज त्रिकोण =दोन बाजूंची लांबी समान असते. समान
लांबीच्या बाजूंसमोरील कोन सारख्या मापाचे असतात.
(3) विशालकोन त्रिकोण = तीनही बाजू सारख्या नसतात. तीनही
कोन सारखे नसतात.
===============