मिशन
स्कॉलरशिप / मिशन नवोदय{मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या
[चौकोन, वेळ व कॅलेंडर]
संकलन – महादेव बाबासाहेब पाटील
============
{1} चौकोन = चार
बाजू, चार कोन आणि चार शिरोबिंदू असणाऱ्या बंद आकृतीस चौकोन म्हणतात.
चौकोनाच्या चारही
कोनांची बेरीज 360 अंश असते.
{2} चौकोनाचे प्रकार
(1) चौरस
= ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या व चारही कोन समान मापाचे असतात, त्यास
चौरस म्हणतात.
चौरसाच्या 4
बाजू समान लांबीच्या व प्रत्येक कोन काटकोन असतो.
(2) आयत = ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या व
प्रत्येक कोन काटकोन असतो. त्यास आयत म्हणतात.
(3) समभूज
चौकोन = चारही बाजू समान लांबीच्या
असणाऱ्या चौकोनास समभूज चौकोन म्हणतात.
समभूज
चौकोनात समोरासमोरील कोन समान मापाचे आणि प्रत्येक बाजू समान मापाची असते.
(4) पतंग = ज्या चौकोनाच्या वरच्या लगतच्या दोन बाजू समान लांबीच्या तसेच खालच्या लगतच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्यास पतंग म्हणतात.
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––
वेळ व कॅलेंडर
{1} वेळ =
1
मिनिट = 60 सेकंद
1 तास = 60 मिनिटे =3600 सेकंद
1
दिवस = 24 तास = 1440 मिनिटे = 86400 सेकंद
{2} कॅलेंडर =
1 आठवडा = 7 दिवस
1 वर्ष = 365 दिवस
1 लीपवर्ष = 366 दिवस
(फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो)
{3} लीपवर्ष = ज्या
वर्षाला 4 ने पूर्णपणे निःशेष भाग जातो त्याला लीपवर्ष म्हणतात.
लक्षात ठेवा : 1800,
1900, 2000 यापैकी फक्त 2000 हे लीपवर्ष कारण त्याला 400 ने निःशेष भाग जातो.
{4} प्रत्येक 7
दिवसानंतर पुन्हा तोच दिवस येतो.
=====================