मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी
/ 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-बुद्धिमत्ता चाचणी
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = =
प्र.{1}
इंग्रजीमधे शरदला सतिशपेक्षा जास्त गुण मिळाले. सतीशला रमेशपेक्षा जास्त गुण
मिळाले. शरदला समीरपेक्षा कमी गुण मिळाले; तर गणितात सर्वात जास्त गुण कोणाला
मिळाले ?
1)समीर
2)शरद
3)सतीश
4)रमेश
प्र.{2}
एका मुलीला पाहून आदिती म्हणाली, ‘ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलीची मुलगी
आहे.’तर आदितीचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते?
1)बहिण
2)मुलगा
3)काकी
4)आई
प्र.{3}
साहिल पार्थपेक्षा 366 दिवसांनी लहान आहे. पार्थचा जन्मवार शुक्रवार असेल; तर
साहिलचा जन्मवार कोणता?
1)गुरुवार
2)शनिवार
3)रविवार
4)सोमवार
प्र.{4}
एका सांकेतिक भाषेत 32=9, 42=16, आणि 23=8असेल;तर 44 ही सांकेतिक भाषेतील संख्या
कशी लिहाल?
1)256
2)128
3)202
4)250
प्र.{5}
“संख्यांच्या स्थानांची महत्त्वपूर्ण अदलाबदल
झाली.” या वाक्यात जोडाक्षरे किती?
1)6
2)5
3)4
4)3
प्र.{6}
एका सांकेतिक भाषेत ‘भरत’ हा शब्द DOK असा
लिहितात; तर ‘परत’ हा शब्द ‘MOK’ असा लिहितात; तर ‘परभ’ हा
शब्द कसा लिहितात?
1)MOD
2)MOK
3)OMK
4)DOM
प्र.{7}
संकल्पची गाडी पश्चिमेला जात होती. नंतर मोटारगाडी दोन वेळा काटकोनात उजवीकडे व
दोन वेळा काटकोनात डावीकडे वळली; तर आता गाडी कोणत्या दिशेने चालली आहे?
1)पूर्व
2)पश्चिम
3)29
4)उत्तर
प्र.{8} गटात न बसणारे पद कोणते?
1) T
2) P
3) D
4)
I
प्र,{9} झाडांच्या रांगेत चिक्कुचे झाड उजवीकडून 15 वे आहे, डावीकडून 8 वे
आहे;तर त्या रांगेत एकूण झाडे किती?
1) 22
2)21
3)23
4)24
प्र.{10} संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती?
22,26,34,41,46, ?
1)56
2)57
3)49
4)50
= = = = = = = = =