मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-24]
संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} दर 5 मीटरवर एक याप्रमाणे 1.5 कि.मी. लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली आहेत,तर एकीन किती झाडे लावली आहेत?
1)602
2)1200
3)600
4)598
प्र.{2} एका
भागाकाराच्या उदाहरणात 18 भाजक, 15 भागाकार आणि बाकी 9 उरते;तर भाज्य संख्या
कोणती?
1)177
2)153
3)279
4)261
प्र.{3} रोज अर्धा लीटर
दूध सप्टेंबरमध्ये महिनाभर घेतले.दूधाचा भाव 9.50 रु. प्रतीलीटर असल्यास दुधाचे
एकूण बिल किती?
1)249.50
2)285रु.
3)275रु.
4)142.50रु.
प्र.{4} सकाळी 7 वाजून
25 मिनिटांनी सुटणारी गाडी 9 वाजून 5 मिनिटांनी सुटेल; तर गाडी किती मिनिटे
उशिराने सुटेल?
1)100 मि.
2)160 मि.
3)140 मि.
4)यापैकी नाही
प्र.{5} 5 टेबले व 4
खुर्च्या यांची एकूण किंमत 1200 रु. असून 4 टेबले व 5 खुर्च्या यांची किंमत 1095
रु. आहे;तर एका टेबलाची किंमत कती?
1)200 रु.
2)180 रु.
3)150 रु.
4)210 रु.
प्र.{6} 576 रुपयांत 2
रुपयांच्या 8 नोटा आहेत, 10 रुपयांच्या 15 नोटा आहेत व उरलेल्या सर्व 5 रुपयांच्या
नोटा आहेत; तर 5 रुपयांच्या एकूण नोटा किती?
1)101
2)104
3)102
4)103
प्र.{7} एका चौरसाची
परिमिती 28 सेमी आहे; तर त्याचे क्षेत्रफळ किती?
1)49 सेमी
2)192 चौ.सेमी
3)49 चौ.सेमी
4)78 चौ सेमी
प्र.{8} एका प्राणी
संग्रहालयातील पोपट व ससे यांची एकूण संख्या 120 आहे. पोपटांची संख्या सशांची
संख्येपेक्षा दोन डझनांनी जास्त असल्यास; सशांची एकूण संख्या किती?
1)72
2)46
3)48
4)यापैकी नाही
प्र.{9} (XXX – IX) VII = किती?
1)IV
2)VI
3)V
4)III
प्र.{10} पाव मिनिटात
एक याप्रमाणे पाऊण तासात किती डझन टिकल्या तयार होतील?
1)15
2)18
3)12
4)16
प्र.{11} 15 या
संख्येच्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती?
1)225
2)15
3)75
4)125
प्र.{12} 25 चे एकूण
विभाजक किती?
1)1
2)3
3)5
4)25
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = == = =