मिशन
स्कॉलरशिप / मिशन नवोदय {मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या
[व्यवहारी अपूर्णांकावरील
क्रिया व दशांश अपूर्णांक]
संकलन – महादेव बाबासाहेब पाटील
(1) अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त – जेंव्हा अपूर्णांकाचा अंश छेद होतो तेंव्हा तयार होणारा अपूर्णांक हा
दिलेल्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त अपूर्णांक म्हणतात.
(2) अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी
– जेंव्हा अपूर्णांकाचे छेद सारखे असतात तेंव्हा फक्त अंशाची बेरीज केली
जाते व छेद तोच राहतो. छेदांची बेरीज करू नये.
(3)
छेद सारखा असणाऱ्या अपूर्णांकाची वजाबाकी करताना अंशाची वजाबाकी करावी व छेद तोच
ठेवावा.
(4)
जेंव्हा दिलेल्या अपूर्णांकाचे छेद सारखे नसतील तेंव्हा छेदांचा ल.सा.वि. काढून ते
सारखे करावेत व नंतर वजाबाकी किंवा बेरीज करावी.
(5) अपूर्णांकाचा गुणाकार = अपूर्णांकाचा गुणाकार
करताना अंशाला अंशाने व छेदाला छेदाने गुणावे.
(6) अपूर्णांकाचा भागाकार = एका अपूर्णांकाला
दुसऱ्या अपूर्णांकाने भागले तर भाजकाचा गुणाकार व्यस्त करावा आणि भागाकाराचे चिन्ह
गुणाकारात रुपांतरीत करावे.
================================
*दशांश अपूर्णांक*
(1) बेरीज व वजाबाकी =
दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना अंक एकाखाली एक असावेत व दशांश चिन्ह हे एकाखाली
एक असेच हवे.
{जर
दशांश अपूर्णांकाला 10,100,1000,........ इ. संख्यांनी गुणले तर 1 वर जेवढे शून्य
आहेत तेवढ्या अंकांनी दशांश चिन्ह उजवीकडे सरकवावे.}
(2) दशांश अपूर्णांकाचा गुणाकार = येथे नेहमीप्रमाणे गुणाकार करा. गुण्य व गुणक मध्ये दोघांचे मिळून किती अंकांच्या
पूर्वी दशांश चिन्ह आहे ते पहा व उत्तरात तेवढ्याच अंकापूर्वी (उजवीकडून) दशांश
चिन्ह द्या.
{जर
एखाद्या संख्येला 10, 100, 1000,..........इ. नी.भागले तर 1 वर जेवढे शून्य आहेत
तेवढ्या स्थळांनी दशांश चिन्ह डावीकडे लिहावे.}
(3) दशांश अपूर्णांकाचा भागाकार = कोणत्याही संख्येला जर दशांश चिन्ह असणाऱ्या संख्येने भागले तर अंश व छेद
यांच्यामध्ये दशांश चिन्ह सारख्या स्थळांनी उजवीकडे असे लिहावेत कि छेद ही पूर्ण
संख्या होईल. आता नेहमीप्रमाणे भागाकार करा.