मिशन
स्कॉलरशिप {मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या
[व्यवहारी अपूर्णांक]
संकलन – महादेव बाबासाहेब पाटील
1)अपूर्णांक
= एखाद्या पूर्ण मापाचा काही भाग म्हणजे अपूर्णांक होय.
2) छेदाधिक
अपूर्णांक = या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा लहान असतो.
उदा. 9/12, 11/19 इ.
3) अंशाधिक
अपूर्णांक = या अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो.
उदा. 14/10, 16/19
4)
पूर्णांकयुक्त अपूर्णांक = जेंव्हा दिलेल्या अपूर्णांकात पूर्ण संख्या आणि
छेदाधिक अपूर्णांक असतो तेंव्हा त्या अपूर्णांकाला
पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात.
उदा.9 3/4 , 5 8/9 इ.
5)
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रुपांतर करणे :
अंशाधिक अपूर्णांक = पूर्ण संख्या × छेद + अंश
उदा. 5 8/9 = 5 × 9 + 8 / 9 = 45 + 8 / 9 = 53 / 9
6)
अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रुपांतर करणे.
पूर्णांकयुक्त अपूर्णांक = भागाकार × बाकी / छेद
7)
सममूल्य अपूर्णांक = ज्या अपूर्णांकाची किंमत समान असते अशा अपूर्णांक
म्हणतात.
उदा. = 1/2 = 9 / 18 = 200 / 400 = 300 / 600
8)
अपूर्णांकाची तुलना :
(1)अंश सारखेच असताना- ज्या अपूर्णांकाचा छेद लहान
तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान.
(2)
जेंव्हा अपूर्णांकाचे छेद सारखे असतात :
अंश लहान असणारा लहान अपूर्णांक व अंश मोठा असणारा मोठा अपूर्णांक.
(3) जेंव्हा अपूर्णांकाचे छेद किंवा अंश सारखे नसतात तेंव्हा ते सारखे करून लहानमोठेपणा ठरवावा.