मिशन
स्कॉलरशिप / मिशन नवोदय {मिस्कॉ}
विषय- गणित
महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या
[विभाज्यतेच्या कसोट्या]
संकलन – महादेव बाबासाहेब
पाटील
{1} 2
ची कसोटी - ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक
असतो त्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो.
{2}3
ची कसोटी - ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो; त्या
संख्येला 3 ने निःशेष भाग जातो.
{3}4 ची
कसोटी - ज्या संख्येतील दशक व एकक यांनी मिळून तयार होणाऱ्या
संख्येला 4 ने भाग जातो; त्या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो.
{4} 5 ची कसोटी
- ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 ने निःशेष भाग
जातो.
{5} 6 ची कसोटी - ज्या
संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो.
{6} 7 ची कसोटी -
संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणा-या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी
तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस 7 ने
निःशेष भाग गेल्यास त्या संख्येला 7 ने निःशेष भाग जातो.
{7} 8 ची कसोटी - ज्या
संख्येतील शतक, दशक व एकक यांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जातो त्या
संख्येला 8 ने निःशेष भाग जातो.
{8} 9 ची कसोटी - ज्या
संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने निःशेष भाग
जातो.
{9} 10 ची कसोटी - ज्या संख्येतील एककस्थानचा अंक 0 असतो त्या संख्येला 10 ने निःशेष भाग जातो.
{10} 11 ची कसोटी -
ज्या संख्येतील सम स्थानावरील अंकांची बेरीज व विषम स्थानांवरील अंकांची बेरीज
यामधील फरक 0 असेल किंवा 11 ने भाग जाणारा असेल तर त्या संख्येला 11 ने निःशेष भाग
जातो.
{11} 12 ची कसोटी - ज्या
संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निःशेष भाग जातो.
{12} 15 ची कसोटी -
ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने निःशेष भाग जातो.
{13} 18 ची कसोटी - ज्या
संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने निःशेष भाग जातो.
{14} 36 ची कसोटी -
ज्या संख्येच्या अंकास 9 ने भाग जातो आणि ज्या संख्येतील शेवटच्या अंकांना 4 ने
भाग जातो त्या संख्येस 36 ने भाग जातो किंवा ज्या संख्येला 9 व 4 ने निःशेष भाग
जातो, त्या संख्येला 36 ने निःशेष भाग जातो.
{15} 72 ची कसोटी -
ज्या संख्येला 9 व 8 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 72 ने निःशेष भाग जातो.
======================