पदावली (महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या)



मिशन स्कॉलरशिप  / मिशन नवोदय{मिस्कॉ}

        विषय- गणित 

महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या 

[पदावली]

संकलन – महादेव बाबासाहेब पाटील

@ पदावलीमध्ये कंस दिला असल्यास कंसातील क्रिया सर्वप्रथम सोडवावी.

@ एखाद्या उदाहरणात फक्त बेरीज व वजाबाकी असेल, तर डाव्या बाजूने आलेली क्रिया प्रथम सोडवावी.

@ एखाद्या उदाहरणात फक्त गुणाकार व भागाकार असेल, तर डाव्या बाजूने आलेली क्रिया प्रथम सोडवावी.

@ एखाद्या उदाहरणात बेरीज व वजाबाकी यापैकी एक क्रिया असेल, तगर गुणाकार व भागाकार यापैकी आलेली क्रिया प्रथम करावी व नंतर बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया करावी.

@ एखाद्या उदाहरणात चारही क्रिया आल्या असल्यास प्रथम गुणाकार किंवा भागाकार या क्रिया त्यांच्या डाव्या बाजूने आलेल्या क्रमानुसार सोडवाव्यात नंतर बेरीज किंवा वजाबाकी या क्रिया त्यांच्या डाव्या बाजूने आलेल्या क्रमानुसार सोडवाव्यात.

 

                         *संख्येचे विभाजक (अवयव) व विभाज्य*

@दिलेल्या संख्येला ज्या संख्येने निःशेष भाग जातो ती संख्या म्हणजे विभाजक संख्या होय आणि ज्या संख्येला दिलेल्या संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजे विभाज्य संख्या होय.

 *उदा.- 42 ÷ 6 =7 [यामध्ये , 42 हि संख्या 7 ची विभाज्य संख्या आहे; तर 7 हि संख्या

42 ची विभाजक संख्या आहे.

@विभाजक काढणे म्हणजे त्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी निःशेष भाग जातो, अशा संख्या शोधणे.

@ कोणत्याही संख्येला 1 ने व ती संख्या याने निःशेष भाग जातोच, म्हणजेच 1 व ती संख्या हे त्या त्या संख्येचे विभाजक असतातच. 

@ 1 या संख्येस फक्त 1 हा एकच विभाजक असतो.

@ मूळ संख्येस फक्त दोनच विभाजक संख्या असतात.

@ संयुक्त संख्येला तीन किंवा तीनपेक्षा जास्त विभाजक संख्या असतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.