कोन महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या (ANGLE)

 



मिशन स्कॉलरशिप / मिशन नवोदय {मिस्कॉ}

        विषय- गणित

            महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या

            [कोन]

        संकलन – महादेव बाबासाहेब पाटील

----------------------------------------------------------------------------------------------------------------

कोन

{1} कोन : जेंव्हा दोन किरणांचा आरंभबिंदू एकाच असतो तेंव्हा ते दोन किरण कोन तयार करतात.

    प्रत्येक कोनाला 1 शिरोबिंदू व दोन किरणे असतात.

{2} कोनांचे प्रकार :

(1) लघुकोन = ज्या कोणाचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते त्यां कोनाला       लघुकोन म्हणतात. 

  

(2) काटकोन = 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात                                                                                          . (3) विशालकोन = ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी असते त्या कोनाला विशालकोन म्हणतात.  

(4) सरळकोन = ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला सरळकोन म्हणतात.

(5) कोटिकोन = जेंव्हा दोन कोनांची बेरीज 90 अंश असते तेंव्हा ते दोन कोन एकमेकांचे कोटीकोन असतात.

(6) पूरककोन = जेंव्हा दोन कोनांची बेरीज 180 अंश असते तेंव्हा ते दोन कोन एकमेकांचे पूरककोन असतात.

 

(7) संलग्न कोन =जेंव्हा दोन कोनांचा एक शिरोबिंदू आणि एक भुजा सामाईक असते आणि उरलेल्या दोन भुजा सामाईक भुजेच्या विरुद्ध बाजूला असतात तेंव्हा त्या दोन कोनांना संलग्न कोन म्हणतात.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.