मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
गुण-22
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1}
50 रुपयांच्या बंडलात 50767 पासून 50791 क्रमांकापर्यंतच्या नोटा मंगेशजवळ आहेत.तर
मंगेशजवळ एकूण किती रुपये आहेत?
1)1200रु.
2)1150 रु.
3)1250 रु.
4)1300 रु.
प्र.{2}
7 किग्रॅ तांदूळापैकी पावणेसहाशे ग्रॅम तांदूळ वापरले, तर किती तांदूळ शिल्लक
राहिले?
1)6.625 किग्रॅ
2)6.425 किग्रॅ
3)6.575 किग्रॅ
4)6525 किग्रॅ
प्र.{3}
448 लीटर दूध 64 घागरींमध्ये ठेवले. प्रत्येक घागरीत सारखेच दूध मावते, तर
प्रत्येक घागरीत किती लीटर दुध मावते?
1)6
2)8
3)9
4)7
प्र.{4}
एका संख्येच्या तिपटीतून त्या संख्येची दुप्पट वजा केल्यास 48 उरतात, तर ती संख्या
कोणती?
1)240
2)144
3)96
4)48
प्र.{5}
23 × 16 = किती?
1)20×10+3×6
2)20×16+3×16
3)20×16+30×16
4)2×16+3×16
प्र.{6]
36,754 या संख्येच्या विस्तारित रुपात नसणारी संख्या कोणती?
1)700
2)6000
3)3000
4)50
प्र.{7}
1)
2
2)
3
3)
2
4)
1
प्र.{8}
एका शहरात चार चाकी वाहनांपेक्षा 2135 दुचाकी वाहने जास्त आहेत. जर चारचाकी वाहने
3729 असतील; तर दुचाकी वाहनांची संख्या किती?
1)4854
2)5784
3)6864
4)5864
प्र.{9}
कोणती संख्या दोन समान अवयवांच्या रुपात लिहिता येणार नाही?
1)64
2)36
3)84
4)49
प्र.{10}
राजाभाऊंनी पावणे तेरा रुपयांचा रुमाल, साडे बारा रुपयांची केळी व पावणे पाच
रुपयांचे चुरमुरे घेतले तर त्यांनी किती रुपये खर्च केले?
1)20 रु.
2)30 रु.
3)40 रु.
4)50 रु.
प्र.{11]
मोजपट्टीचा आकार खालीलपैकी कसा असतो?
1)चौरसाकृती
2)त्रिकोणाकृती
3)आयताकृती
4)घनाकृती
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =