मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-मराठी
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा.— वाचतो मी वर्तमानपत्र कधीतरी.
1)वाचतो
2) वर्तमानपत्र
3) कधीतरी
4)मी
प्र.{2} शुद्ध वाक्य ओळखा.
1)तो शेतकऱ्याच्या शंखांचे निरसन करतो.
2)तो शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन
करतो.
3) तो शेतकऱ्यांच्या संकांचे निरसन करतो.
4) तो शेतकऱ्यांच्या शकांचे निरसन
करतो.
प्र.{3} पुढीलपैकी कोणता शब्द नाम आहे ?
1)कौतुक
2)सोनेरी
3)हुशार
4)खडबडीत
प्र.[4} वर्णानुक्रमे शब्दक्रम लावल्यास कोणता शब्द दुसरा येतो?
1)बाजरी
2)बातमी
3)बादली
4)बासरी
प्र.{5} पुढील शब्दातील प्रत्यय ओळखा.------ लहानपण ...
1)पण
2)ल
3)लहा
4)हा
प्र.{6} लोहपुरूष कोणाला म्हणतात?
1)सरदार वल्लभभाई पटेल
2)मौलाना
अबुलकलाम आझाद
3)पंडित गोविंदभाई वल्लभ
4)भगतसिंग
प्र.{7} तरू म्हणजे काय? ----
1)पान
2)तरुण
3)असत्य
4)झाड
प्र.{8} खालील शब्दांचे अनेकवचनी रूप ओळखा.
खांब -
1) खांब
2) खांबे
3)खांब्या
4)खांब
प्र.{9} अशुद्ध शब्द ओळखा.—
1)अंधकार
2) नमःस्कार
3) उष:काल
4) घनश्याम
प्र.{10} ‘खटाटोप’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
1)प्रयत्न
2) टोप
3) शोध
4) जादू
प्र.{11} उपसर्ग नसणारा शब्द कोणता?
1) आशीर्वाद
2) आमरण
3) आभूषण
4)आसक्त
= = = = = = = =