मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-24]
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
प्र.{1} खालीलपैकी चूकीचे विधान कोणते?
1)कोणत्याही विषम संख्येत 20 मिळवले तर विषम संख्या येते.
2)कोणत्याही
सम संख्येत 2 मिळवले तर सं संख्या येते
3)कोणत्याही विषम संख्येत 1 मिळविला तर सं संख्या येते.
4)कोणत्याही
सं संख्येत 1 मिळविला तर सम संख्या येते.
प्र.{2} 2079 या संख्येतून कमीत कमी किती वजा करावेत म्हणजे येणाऱ्या संख्येस 4 ने निःशेष भाग जाईल?
1)4
2)1
3)0
4)3
प्र.{3}
15 लीटर तेल प्रत्येक बाटलीत 250 मिली प्रमाणे भरल्यास एकूण किती बाटल्या भरतील?
1)6
2)60
3)600
4)16
प्र.{4}
20 मीटर लांबी असलेल्या एका चौरसाकृती जागेच्या चारही बाजूवर झाडे लावण्यासाठी 4 -
4 मीटर अंतरावर किती खड्डे घेता येतील?
1) 5
2) 21
3) 20
4) 80
प्र.{5}
एका डब्यात 50 रु. आहेत, त्यामध्ये 25 पैशाची 12 नाणी आहेत व उरलेली 50 पैशांची
नाणी असल्यास डब्यात किती नाणी आहेत?
1) 94
2)181
3)106
4)180
प्र.{6}
21 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 8 वेढे देण्यासाठी 544 मीटर
तार लागली; तर त्या बागेची रुंदी किती मीटर असेल?
1)12 मी.
2)16 मी.
3)13 मी.
4)20 मी.
प्र.{7}
5 ग्रॅम 500 मिलीग्रॅमची 1 अंगठी याप्रमाणे 6 अंगठ्या तयार करण्यास किती सोने
लागेल?
1)32 ग्रॅम
2)33 ग्रॅम
3)34 ग्रॅम
4)35 ग्रॅम
प्र.{8}
खालील पर्यायांपैकी लघुत्तम अपूर्णांक कोणता?
1) 9/17
2) 5/17
3) 1/17
4) 3/17
प्र.{9} 2008 साली गांधी जयंती शुक्रवारी होती, तर 2009 सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल?
1)मंगळवारी
2)सोमवारी
3)बुधवारी
4)शुक्रवारी
प्र.{10}
एका ओळीत 25 रोपे लावली तर 12250 रोपांच्या किती ओळी होतील?
1)450
2)460
3)470
4)490
प्र.{11}
प्रत्येकी 60 मुलांचे 5 वर्ग एकत्र करून 15 मुलांचा एक गट तयार केल्यास किती गात
तयार होतील?
1)25
2)20
3)15
4)10
प्र.12}
51038 + 47853 =?
1)99881
2)98981
3)98891
4)98991
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =