मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय-मराठी
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = =
= = = = = = = = = = = = = = =
{1} ‘राशी’ या शब्दाचा प्रतिशब्द लिहा.
1)चंद
2)ढग
3)ससा
4)चांदणे
{2} खालील शब्दाचा उपसर्ग ओळखा.
असाध्य –
1) अ
2) असा
3) ध्य
4) साध्य
{3} खालील शब्दातील प्रत्यय ओळखा.
ज्ञानी –
1) ज्ञा
2) आ
3) इ
4) नी
{4} समूहदर्शक शब्द लिहा.
लोंगर
कशाचा?
1)पुस्तकांचा
2)केळयांचा
3)दूर्वांचा
4) नारळांचा
{5} ‘ बटाट्याची चाळ’ हे पुस्तक कोणी लिहिले?
1) प्र.के.अत्रे
2) विनोबा भावे
3) पु. ल. देशपांडे
4) लक्ष्मण
माने
{6} खालील शब्दांतून अशुद्ध शब्द ओळखा.
1) धार्मिक
2) ईतीहास
3) लेखिका
4)
निरीक्षण
{7} कर्ण, कृपा, कौरव, काळा हे शब्द क्रमाने
लावल्यास शेवटी कोणता शब्द येईल?
1) कौरव
2)कृपा
3) काळा
4) कर्ण
{8) ‘कृष्णाजी केशव दामले’ यांचे टोपणनाव कोणते?
1) बालकवी
2) गोविंदाग्रज
3) कुसुमाग्रज
4)
केशवसुत
{9) ‘रमण’ आईची लाल साडी घेऊन पळत आला.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण
4)
क्रियापद
{10} पक्षीतज्ज्ञ म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते?
1)डॉ. सलीम अली
2)जमशेदजी टाटा
3)राहुल बजाज
4) बाबा आमटे
= = = = = = = = = = =