मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय- गणित
[गुण-22]
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = = = = = = = = =
प्र.{1} 78 महिने = किती
वर्षे?
1)पावणेसात
2)साडेपाच
3)साडेसहा
4)सव्वासहा
प्र.{2} पुढीलपैकी
सर्वात मोठे परिमाण कोणते?
1)ग्रॅम
2)डेसीग्रॅम
3)हेक्टोग्रॅम
4)सेंटीग्रॅम
प्र.{3} एका चौरसाची
परिमिती 36 सेंमी आहे. या चौरसाच्या बाजुएवढीच लांबी असणा-या एका आयताची परिमिती
22 सेमी असल्यास त्या आयताची रुंदी किती?
1)3 सेमी
2)4 सेमी
3)2 सेमी
4)11 सेमी
प्र.{4} खालील
पर्यायातील कोणत्या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता येईल?
1)4/5
2) 9/15
3) 14 /13
4) 14 / 13
प्र.{5} 500
रुपयांपैकी 25 रुपयांची 8 पाकिटे भरली. उरलेल्या रुपयांपैकी समान 15 पाकिटे
भरण्यासाठी प्रत्येक पाकिटात किती रुपये भरावे लागतील?
1)30 रु.
2)20 रु.
3)15 रु.
4)10 रु.
प्र.{6} रामरावने
16000 रुपयांपैकी अवजारे खरेदीसाठी निम्मी रक्कम वापरली, उरलेल्या रक्कमेपैकी
पावभाग रक्कम स्वतःजवळ ठेवून उरलेली रक्कम मुलाला दिली; तर रामरावने स्वतःजवळ किती
रक्कम ठेवली?
1)4000
2)8000
3)2000
4)6000
प्र.{7} पुढीलपैकी
मूळ संख्यांबाबत योग्य विधान कोणते?
1)2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे.
2)सर्व मूळ संख्या विषम आहेत.
3)1 ते 50 मध्ये 19 मूळ संख्या आहेत.
4)1 ही
सर्वात लहान मूळ संख्या आहे.
प्र.{8) 200 मीटर
लांबीच्या रस्त्यावर प्रत्येक 10 मीटरवर एक याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा एकूण
किती झाडे असतील?
1)21
2)44
3)42
4)22
प्र.{9} 8009 या
संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किंमतीतून दर्शनी किंमत वजा केल्यास उत्तर काय
येईल?
1)8992
2)7992
3)6992
4)5992
प्र.{10} कवायतीसाठी
एका रांगेत जितकी मुले आहेत; तितक्याच रांगा केल्या आहेत. एकूण रांगेतील मुलांची
संख्या 324 आहे. तर एका रांगेतील मुलांची संख्या किती?
1)32
2)28
3)18
4)38
प्र.{11} 5 सहस्त्र व
15 दशक यांचा गुणाकार खालीलपैकी कोणता असेल?
1)75,000
2)7,50,000
3)7,500
4)70,050
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =